सिन्नर शहरात गोवर आणि रूबेला लसीकरण जनजागृती रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 06:16 PM2018-11-25T18:16:36+5:302018-11-25T18:17:06+5:30

गोवर आणि रूबेला लसीकरण हे एक राष्ट्रव्यापी अभियान देशभरात राबविले जात आहे. सिन्नर तालुक्यात या मोहिमेची जनजागृती करण्यात येत असून त्यापार्श्वभूमीवर नगरपरिषदेच्या वतीने शहरातून जनजागृती रॅली काढण्यात आली.

Govor and Rubella vaccination public awareness rally in Sinnar city | सिन्नर शहरात गोवर आणि रूबेला लसीकरण जनजागृती रॅली

सिन्नर शहरात गोवर आणि रूबेला लसीकरण जनजागृती रॅली

Next

सिन्नर : गोवर आणि रूबेला लसीकरण हे एक राष्ट्रव्यापी अभियान देशभरात राबविले जात आहे. सिन्नर तालुक्यात या मोहिमेची जनजागृती करण्यात येत असून त्यापार्श्वभूमीवर नगरपरिषदेच्या वतीने शहरातून जनजागृती रॅली काढण्यात आली. रॅलीचा शुभारंभ जिल्हा परिषद अध्यक्ष सौ. शीतल उदय सांगळे, सौ. दिप्ती राजाभाऊ वाजे व नगराध्यक्ष किरण डगळे यांच्या हस्ते करण्यात आला.
शनिवार (दि.२४) रोजी सकाळी ११ वाजता येथील नगरपरिषद कार्यालयापासून सदर जनजागृती रॅलीची सुरूवात करण्यात आली. शहरातील वावीवेस, क्रांती चौक, लोंढे गल्ली, काजीपुरा, आपना गॅरेज, तानाजी चौक, शिवाजी चौक, गणेशपेठ, लालचौक, गंगा वेस, गोठा, खडकपुरा, पंचायत समिती मार्गे सिन्नर नगरपरिषद कार्यालय प्रांगण या ठिकाणी रॅलीचा समारोप करणत आला. यावेळी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात जनजागृती करण्यात आली. ९ महिने ते १५ वर्ष वयोगटातील सर्व बालकांना गोवर आणि रूबेलाची लस द्यावी व आपल्या बालकांचे आरोग्य सुखरूप करावे असे यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष सांगळे यांनी सांगितले. तसेच गोवरचे दूरीकरण व रूबेलाचे नियंत्रण करण्यासाठी ९ महिने ते १५ वर्ष वयोगटातील सर्व बालकांना एमआरची लस टोचणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन बच्छाव यांनी गोवर व रूबेला लसीकरण मोहिम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. शहरात ९ महिने ते १५ वर्ष वयोगटातील एकूण २४७९४ लाभार्थी असून २७ नोव्हेंबर ते डिसेंबर अखेरपर्यंत सदर मोहीम राबविली जाणार असून प्रथम २ आठवडे शाळा, नंतर २ आठवडे अंगणवाडी केंद्र व १ आठवडा उर्वरित बालकांना लस दिली जाणार आहे. याकरिता एकूण ६५६ कर्मचारी व ५५ पर्यवेक्षक नेमण्यात आले असल्याची माहिती डॉ. प्रशांत खैरनार यांनी दिली. सदर अभियानास शहरातील नागरिक उत्स्फूर्त प्रतिसाद देतील असा आशावाद नगराध्यक्ष किरण डगळे यांनी याप्रसंगी व्यक्त केला. शहर अभियान व्यवस्थापक अनिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत स्थापन उन्नती शहर स्तरीय संघ, सावित्रीबाई, नारीशक्ती, खडकपुरा, भैरवनाथ नगर, सहेली, प्रेरणा वस्ती स्तरीय संघाचे व स्वयंसहायता गटांचे अध्यक्ष, सचिव व सदस्य आदींसह सुमारे १५० महिला उपस्थित होत्या.
यावेळी गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड, उपनगराध्यक्ष शैलेश नाईक, गटनेते हेमंत वाजे, नगरसेवक प्रमोद चोथवे, विजय जाधव, श्रीकांत जाधव, पंकज जाधव, सोमनाथ पावसे, बाळासाहेब उगले, रूपेश मुठे, महिला व बालकल्याण सभापती सुजाता भगत, नगरसेवक मंगला शिंदे, निरूपमा शिंदे, प्रतिभा नरोटे, राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्र्यक्रम अधिकारी डॉ. अजिंक्य वैद्य, डॉ.गरूड, डॉ.गडे, डॉ.सावंत, अधिपरिचारिका सौ. पवार, आरोग्य सेवक वसंत गायकवाड, राष्ट्रीय कुष्टरोग निर्मुलन कर्मचारी सचिन पांचाळ, प्रकाश जाधव, विनीत रोकडे, शहरातील अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा व नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते.

फोटो क्र.-25२्रल्लस्रँ03
फोटो ओळी- सिन्नर नगरपरिषदेच्या वतीने शहरातून गोवर व रूबेला लसीकरण जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीच्या शुभारंभ प्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे, दिप्ती वाजे, किरण डगळे, शैलेश नाईक, हेमंत वाजे, मोहन बच्छाव, लता गायकवाड, प्रमोद चोथवे, विजय जाधव, श्रीकांत जाधव, पंकज जाधव, सोमनाथ पावसे, बाळासाहेब उगले, रूपेश मुठे, सुजाता भगत, मंगला शिंदे, निरूपमा शिंदे, प्रतिभा नरोटे, अनिल जाधव, डॉ. प्रशांत खैरनार, डॉ. अजिंक्य वैद्य आदी.

Web Title: Govor and Rubella vaccination public awareness rally in Sinnar city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.