निवाराशेडसाठी शासन देणार अन्नधान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2020 10:32 PM2020-04-12T22:32:54+5:302020-04-13T01:03:35+5:30
नाशिक : लॉकडाउन व संचारबंदीमुळे राज्यातील अनेक जिल्हे, शहरामध्ये अडकून पडलेल्या बेघर मजुरांच्या निवाराशेडसाठी भोजन पुरविण्यासाठी आता शासनाने अन्न धान्य पुरविण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी पुरवठा विभागाने अन्न धान्य महामंडळाकडून धान्य खरेदी करावयाचे आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्य सरकारने २२ मार्चपासून संचारबंदी व लॉकडाउन जाहीर करण्यात आले असून नागरिकांना आहे तेथेच थांबण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अशा परिस्थितीत लाखो लोक ठिकठिकाणी अडकून पडले आहेत, शासन पातळीवर त्यांच्यासाठी निवाराशेड उभारण्यात आले आहेत, या शेडमध्ये राहणाऱ्या साठी स्वयंसेवी संस्था जीवनावश्यक गरजा पूर्ण करीत आहेत.
त्यामुळे शासनाने असे मजूर राहत असलेल्या निवाराशेडमध्ये सेंट्रल किचनसारखे स्वयंपाकगृह तयार करण्याचे अथवा स्वयंसेवी संस्था जर अन्न शिजवून देत असतील तर त्यांना शासनाच्या वतीने अन्न धान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी अन्न धान्य महामंडळाकडे प्रत्येक जिल्ह्याला आपली मागणी नोंदवावी लागणार आहे, शासकीय दराने गहू उपलब्ध करून देण्याच्या सूचना महामंडळाला देण्यात आल्या आहेत.