नाशिक जि.प. पदभरतीअंतर्गत ६ संवर्गांची होणार परीक्षा
By धनंजय रिसोडकर | Updated: October 11, 2023 15:35 IST2023-10-11T15:34:15+5:302023-10-11T15:35:58+5:30
जिल्हा परिषदेच्या वतीने विविध संवर्गांसाठी पदभरती करण्यात येत आहे ५ ऑगस्टला या पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती.

नाशिक जि.प. पदभरतीअंतर्गत ६ संवर्गांची होणार परीक्षा
नाशिक : जिल्हा परिषदेच्या वतीने विविध संवर्गांसाठी पदभरती करण्यात येत आहे दि. ५ ऑगस्टला या पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या जाहिरातीच्या अनुषंगाने आता कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी), कनिष्ठ अभियंता (विद्युत), वायरमन, फिटर व पशुधन पर्यवेक्षक या ६ संवर्गातील पदांसाठी आयबीपीएस कंपनीच्या वतीने विविध परीक्षा केंद्रांवर १५ व १७ ऑक्टोबरला ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेतली जाणार आहे.
यासंदर्भातील जिल्हा परिषद पदभरतीचे वेळापत्रक व परीक्षा केंद्र यासाठीचे प्रकटन हे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा सदस्य जिल्हा निवड समिती आशिमा मित्तल यांच्यावतीने प्रसिद्ध करण्यात आले असून, नाशिक जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवर हे प्रकटन उपलब्ध करून देण्यात आले आहे. सर्व परीक्षार्थींनी याबाबत नोंद घ्यावी असे आवाहन देखील त्यांनी केले आहे. संकेतस्थळावरून विद्यार्थांना हॉल तिकीट उपलब्ध होणार आहेत. विद्यार्थ्यांनी रजिस्टर केलेल्या मोबाईल नंबर व ईमेल आयडीवर देखील हॉल तिकीटची लिंक पाठवण्यात आलेली आहे.