जि.प. अध्यक्षपदाची निवडणूक २१ रोजी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2019 07:22 PM2019-12-10T19:22:11+5:302019-12-10T19:23:50+5:30
नाशिकसह राज्यातील जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व पदाधिका-यांची अडीच वर्षांची मुदत सप्टेंबरमध्ये संपुष्टात येत असताना राज्यात विधानसभा निवडणुकीचा माहोल सुरू असताना युती सरकारने जिल्हा परिषदेच्या सर्व अध्यक्ष व पदाधिका-यांना चार महिन्यांची
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : सप्टेंबर महिन्यात मुदत संपुष्टात येणाऱ्या जिल्हा परिषद अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांना देण्यात आलेली चार महिन्यांची मुदत येत्या २० डिसेंबर रोजी संपुष्टात येत असल्याने नवीन अध्यक्ष व पदाधिका-यांची निवडणूक घेण्याच्या सूचना राज्याच्या ग्रामविकास विभागाने सर्व जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिका-यांना दिल्यामुळे नाशिक जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, पदाधिकाºयांची निवडणूक येत्या २१ डिसेंबर रोजी होण्याची शक्यता आहे.
नाशिकसह राज्यातील जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व पदाधिका-यांची अडीच वर्षांची मुदत सप्टेंबरमध्ये संपुष्टात येत असताना राज्यात विधानसभा निवडणुकीचा माहोल सुरू असताना युती सरकारने जिल्हा परिषदेच्या सर्व अध्यक्ष व पदाधिका-यांना चार महिन्यांची मुदतवाढ देणारा निर्णय २३ आॅगस्ट २०१९ रोजी काढले होते. या मुदतवाढीमागे दोन कारणे होती. त्यात प्रामुख्याने चालू वर्षात लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे पदाधिका-ना जवळपास चार महिने कोणतेही कामकाज करता आले नव्हते, त्याचबरोबर ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अध्यक्ष व पदाधिका-यांच्या निवडणुकीवरून पक्षांतर्गत राजी-नाराजी घडून त्यातून सत्ताधाºयांना फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात होती ते टाळण्यासाठी सरकारने चार महिन्यांची मुदतवाढ विद्यमान पदाधिकाºयांना दिली. त्यातही एक महिन्यांचा काळ विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे कोणतेही कामकाज करता आले नव्हते. आचारसंहिता संपुष्टात येताच मात्र पदाधिकाºयांनी कामकाजाला गती दिली होती. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाधिकाºयांची मुदत संपुष्टात येण्याच्या शक्यतेने गेल्या महिन्यातच अध्यक्षपदाचे आरक्षण काढण्यात आले होते. जिल्हा परिषदांबरोबरच महापालिकेच्याही महापौरांनाही सरकारने मुदत दिली होती. मात्र त्यांची नोव्हेंबर महिन्यातच निवडणूक घेण्यात आली. जिल्हा परिषदेबाबत शासनाच्या आदेशाची प्रतीक्षा होती. ती मंगळवारी संपुष्टात आली. ग्रामविकास विभागाने या संदर्भातील आदेश काढून येत्या २० डिसेंबर रोजी पदाधिकाºयांची मुदतवाढ संपुष्टात येत असून, त्या अनुषंगाने जिल्हा परिषदांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, विषय समित्यांचे सभापती आणि पंचायत समित्यांचे सभापती, उपसभापतींच्या निवडणुका घेण्याबाबत कार्यवाही करावी, अशा सूचना दिल्या आहेत.
नाशिक जिल्हा परिषदेलाही ग्रामविकास विभागाचे आदेश प्राप्त झाले असून, प्रशासनाने निवडणूक घेण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत. मात्र अध्यक्ष, पदाधिकाºयांच्या निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यासाठी नियमानुसार दहा दिवसांचा कालावधी द्यावा लागतो. विद्यमान पदाधिकाºयांची मुदत दि. २० डिसेंबर रोजी संपुष्टात येत असली, त्याच दिवशी अथवा तत्पूर्वी या निवडणुका घेणे कायदेशीरदृष्ट्या अशक्य असल्याने साधारणत: २१ डिसेंबर रोजी निवडणूक होण्याची शक्यता जाणकारांनी वर्तविली आहे.