जीपॅट परीक्षेला संगणकांअभावी चार तासांचा विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2022 01:23 AM2022-04-11T01:23:39+5:302022-04-11T01:24:12+5:30

जीपॅट २०२२ या परीक्षेच्या नाशिकरोड येथील राष्ट्रसंत आचार्य आनंद ऋषि स्कूल कॅम्पसमधील ग्लोबल सोल्युशन परीक्षा केंद्रावर शनिवारी (दि. ९) ऐनवेळी सुमारे पन्नासहून जास्त विद्यार्थ्यांना संगणकच उपलब्ध होऊ न शकल्याने झाल्याने या परीक्षेत गोंधळ उडाल्याने विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला.

GPAT exam delayed by four hours due to lack of computers | जीपॅट परीक्षेला संगणकांअभावी चार तासांचा विलंब

जीपॅट परीक्षेला संगणकांअभावी चार तासांचा विलंब

googlenewsNext

नाशिक : जीपॅट २०२२ या परीक्षेच्या नाशिकरोड येथील राष्ट्रसंत आचार्य आनंद ऋषि स्कूल कॅम्पसमधील ग्लोबल सोल्युशन परीक्षा केंद्रावर शनिवारी (दि. ९) ऐनवेळी सुमारे पन्नासहून जास्त विद्यार्थ्यांना संगणकच उपलब्ध होऊ न शकल्याने झाल्याने या परीक्षेत गोंधळ उडाल्याने विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला. त्याचप्रमाणे अशा प्रकारे परीक्षा केंद्रावर गोंधळ उडाल्याने परीक्षा केंद्राच्या आवारात अनेक त्रुटी असल्याचेही समोर आले आहे. दरम्यान, संगणकांअभावी ज्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या निश्चित वेळेत पेपर देता आला नाही, अशा विद्यार्थ्यांना अगोदरच्या विद्यार्थ्यांचा पेपर झाल्यानंतर पेपर देण्याची व्यवस्था करण्यात आली. झाली. त्यामुळे राज्यभरातून आलेल्या विद्यार्थ्यांना तीन ते चार तास ताटकळत बसावे लागले; तर काही विद्यार्थ्यांना दुपारच्या सत्रातील इतर परीक्षांना मुकावे लागले.

Web Title: GPAT exam delayed by four hours due to lack of computers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.