जमीन विक्रीतून ४५ लाखांना गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 12:53 AM2018-10-15T00:53:38+5:302018-10-15T00:54:40+5:30
वडिलोपार्जित जमिनीवर पत्नी व मुलाचे नाव असताना बनावट कागदपत्रे तयार करून एजंटच्या मदतीने खरेदीदाराची ४५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात तिघा संशयितांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
नाशिक : वडिलोपार्जित जमिनीवर पत्नी व मुलाचे नाव असताना बनावट कागदपत्रे तयार करून एजंटच्या मदतीने खरेदीदाराची ४५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात तिघा संशयितांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
आडगाव येथील अनिल निंबा पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित विशाल दिंडे याची नांदूर नाका येथे वडिलोपार्जित शेतजमीन असून त्यावर पत्नी स्रेहा व मुलाचेही नाव आहे़ दिंडे याने संशयित अशोक मारुती उबाळे (रा़पंचवटी) याच्या मदतीने जमिनीची बनावट कागदपत्रे तयार करून दुय्यम निबंधक कार्यालयात जमा केली होती़ संशयित विशालने पत्नी स्रेहाऐवजी दुसऱ्याच महिलेला उभे करून ओळख दिली व फोटो जोडून जमीन अनिल पाटील यांच्यासह आणखी एकास विक्री केली. या बदल्यात खरेदीदारांकडून ४४ लाख ८६ हजार रुपयांची रोकड घेतली. पाटील यांनी कागदपत्रांची पाहणी केली असता विशालच्या पत्नीऐवजी दुसºयाच महिलेचा फोटो असल्याचे आढळल्याने शहानिशा केली असता हा प्रकार उघडकीस आला.
या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात संशयित अशोक उबाळे, विशाल दिंडे व महिलेविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.