चोरीस गेलेला कंटेनर कर्नाटकातून हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2019 03:49 PM2019-02-02T15:49:22+5:302019-02-02T15:49:35+5:30

वाडिव-हे पोलिसांची कामगिरी : क्लीनरने केला होता पोबारा

Grab the stolen container from Karnataka | चोरीस गेलेला कंटेनर कर्नाटकातून हस्तगत

चोरीस गेलेला कंटेनर कर्नाटकातून हस्तगत

Next
ठळक मुद्देकंटेनर नवीन असल्याने त्यात जीपीएस प्रणाली लावलेली होती. त्यावरून पोलिसांनी कंटेनरचे लोकेशन घेतले असता तो कर्नाटक मध्ये असल्याचे समजले

वाडिव-हे : वाडिव-हे पोलिस स्टेशन हद्दीतील नाशिक मुंबई महामार्गावरील राजूर फाटा येथून काही दिवसांपूर्वी मोठा कंटेनरच चोरीस गेल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले होते. मात्र वाडिव-हे पोलिसांनी त्याचा शोध घेवून संशयित आरोपी क्लीनरसह कंटेनर कर्नाटक येथून ताब्यात घेतला आहे. यामुळे कंटेनर मालक व पोलिस यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
चेन्नई येथून अशोक लेलेंड कंपनीचा कंटेनर (क्रमांक एम.एच.१४ जी.यू.७९९५) हा महिंद्रा कंपनीचा माल घेवून राजुर बहुला(ता.जि.नाशिक) शिवारातील समर्थ लॉजिंस्टिक कंपनी येथे २३ जानेवारीस खाली करण्यासाठी आला होता. चालक पोपट संभाजी नरोटे यांस नातलगाचा फोन आल्याने त्यास त्वरित पुण्यास जायचे होते. पण माल खाली होण्यास वेळ असल्याने पोपट याने आपला क्लीनर नाजिर अहमद मौलाली मुल्ला (वय १९) रा. चौडाली, जि. कारवार,कर्नाटक याच्याकडे विश्वासाने कंटेनरची किल्ली देवून तो पुण्यास निघून गेला. क्लीनरने मात्र या संधीचा फायदा घेत कंटेनर घेवून पोबारा केला. दोन दिवसानंतर तो फोन घेत नसल्याने चालकाने येवून पाहिले असता कंटेनर आणि क्लीनर दोघे गायब असल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्याने व मालकाने वाडिव-हे पोलिसांकडे तक्र र दाखल केली. पोलिस निरीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनखाली पोलीस उपनिरीक्षक शांताराम देशमुख, पोलिस नाईक रूपेश मुळाने, धारणकर,अंबोरे यांच्या पथकाने तपास करत ही कार्यवाही केली.
चाकेही विकून टाकली
कंटेनर नवीन असल्याने त्यात जीपीएस प्रणाली लावलेली होती. त्यावरून पोलिसांनी कंटेनरचे लोकेशन घेतले असता तो कर्नाटक मध्ये असल्याचे समजले. पोलिसांनी तत्काळ कर्नाटक मधील मुंडगोड व बंकापुर पोलिसाशी संपर्क साधत कंटेनर अडवून ठेवला. वाडिव-हे पोलिसांनी तेथे जावून आरोपी व कंटेनर ताब्यात घेतला असता क्लीनरने कंटेनरची चाके विकले होते. पोलिसांनी ते देखील ताब्यात घेतले. असून एकूण १८ लाख रु पये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

Web Title: Grab the stolen container from Karnataka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.