पदवीधर तरु ण दळतो ओले गहू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 12:13 AM2018-04-24T00:13:22+5:302018-04-24T00:13:22+5:30
पदवी घेतली अनेकदा शासकीय नोकरी मिळवण्याचा प्रयत्न केला,परंतु यश आले नाही तरी खचून न जाता प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी व्यवसाय करण्याचा मार्ग निवडला.गेल्या तीन वर्षापासून येवला तालुक्यातील नगरसुल येथील राजु रामभाऊ पैठणकर या पदवीधर तरु णाने स्कूटर खरेदी करून त्यावर मशीन बसवून दारोदारी सन्मानाने ओले गहू दळण्याचा व्यवसाय करीत आपला प्रपंच नेटका चालवीत आहे.बँकांनी मदतीचा हात दिला तर मोठा व्यवसाय करीन ही जिद्द राजूच्या मनात आहे.
येवला : पदवी घेतली अनेकदा शासकीय नोकरी मिळवण्याचा प्रयत्न केला,परंतु यश आले नाही तरी खचून न जाता प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी व्यवसाय करण्याचा मार्ग निवडला.गेल्या तीन वर्षापासून येवला तालुक्यातील नगरसुल येथील राजु रामभाऊ पैठणकर या पदवीधर तरु णाने स्कूटर खरेदी करून त्यावर मशीन बसवून दारोदारी सन्मानाने ओले गहू दळण्याचा व्यवसाय करीत आपला प्रपंच नेटका चालवीत आहे.बँकांनी मदतीचा हात दिला तर मोठा व्यवसाय करीन ही जिद्द राजूच्या मनात आहे. बेताची शेतजमीन,पाणी नाही म्हणून ,वडील अन्यत्र शेतमजुरी करून प्रपंचाचा गाडा घेवून चालवीत राजूला पदवीधर केले.नौकरीचा प्रयत्न केला.पण यश आले नाही.गृहिणींची गरज ओळखून ओले गहू आण िओळी डाळ दळण्याचा व्यवसाय सुरु करण्याच्या विचाराने एक स्कुटर खरेदी केली. त्यासोबत गहु दळण्याचे मशीन खरेदी केले.गाडीवर फिट करु न व्यवसाय सुरु केला. तीन वर्षा पासुन नगरसुल गावात गिरणीचा धंदा करीत असुन दररोज बारा ते पंधरा पायली ओले गहू, व दहा ते बारा किलो वड्याची डाळ दळीत असुन चार महीने हा माझा धंदा तेजीत असतो. कॉल करा काही वेळात गिरण हजर असा माझा परीचय चांगला झाल्याने फोन नंबर सर्वांकडे उपलब्ध आहे. ज्याच्या घरी वीज उपलब्ध असेल त्यांना चाळीस रु पये पायली प्रमाणे दळून देतो.ज्याच्याकडे वीज उपलब्ध नसेल तर स्कूटरच्या मशीनवर पंन्नास रूपये दराने दळून देतो.संगमनेर परिसरात देखील हा व्यवसाय केला.असल्याचे राजूने सांगितले.तीन मिहने चांगला व्यवसाय होतो.
सध्या येवला येथील एचडीएफसी बँकेत सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करीत असुन मला सरकारी नोकरी करीता प्रयत्न करीत आहे.