महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा २२ जूनला पदवी प्रदान समारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2021 04:06 PM2021-06-08T16:06:42+5:302021-06-08T16:09:55+5:30
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विदयापाठाता २०२१ मधील पदवी प्रदान समारंभ २२ जून रोजी होणार असून या पदवी प्रदान सोहळ्यासाठी प्रवेशित होण्यासाठी पात्र असलेल्या इच्छुक विद्यार्थ्यांनी त्यांचे अर्ज आपल्या महाविद्यालयामार्फत सादर करण्याच्या सुचना महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीतर्फे करण्यात आल्या आहेत.
नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विदयापाठाता २०२१ मधील पदवी प्रदान समारंभ २२ जून रोजी होणार असून या पदवी प्रदान सोहळ्यासाठी प्रवेशित होण्यासाठी पात्र असलेल्या इच्छुक विद्यार्थ्यांनी त्यांचे अर्ज आपल्या महाविद्यालयामार्फत सादर करण्याच्या सुचना महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीतर्फे करण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून दण्यात आलेल्या माहितीनुसार, विद्यापीठाशी संलग्नीत सर्व महाविद्यालये, संस्था, अधिष्ठाता तथा महाविद्यालयांचे प्राचार्य यांना परिपत्रक काढून पदवी प्रदान समारंभाची माहिती दिली आहे. त्याचप्रमाणे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील काही भागात लागू असलेली टाळेबंदी आणि प्रवासावरील निर्बंधांमुळे पदवी प्राप्त करणारे विद्यार्थी महाविद्यालयाच्या गावी अथवा शहराच्या ठिकाणी उपस्थित नसतील तर त्यांनी त्यांचे अर्ज पोस्टाद्वारे अथवा कुरीअरद्वारे महाविद्यालयांकडे पाठवावे, तसेच संबधित महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांच्या अर्जावरील फोटो महाविद्यालयातील कागदपत्रावरून पडताळून प्रमाणित केल्यानंतर संबधित विद्यार्थ्यांचा अर्ज विद्यापीठाकडे पाठविण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत. तसेच अशा विद्यार्थ्यांची यादी मेलद्वारे विद्यापीठाला पाठवावी, तसेच संबधित विद्यार्थ्यांच्या अर्जाची एक प्रत ई मेलद्वारे विद्यापीठाला आगाऊ नोंद घेण्यासाठी पाठविण्याच्या सुचना विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक अजित पाठक यांनी केले आहे.