जूनपासून पीओएस प्रणालीनुसार धान्य

By admin | Published: May 21, 2017 12:54 AM2017-05-21T00:54:20+5:302017-05-21T00:54:39+5:30

जूनपासून पीओएस प्रणालीनुसार धान्य

Grain according to POS system from June | जूनपासून पीओएस प्रणालीनुसार धान्य

जूनपासून पीओएस प्रणालीनुसार धान्य

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : धान्य वितरणात पारदर्शकता आणण्यासाठी पुढील महिन्यापासून पॉइंट आॅफ सेल (पीओएस) प्रणाली कार्यान्वित केली जाणार आहे. शहरात जूनच्या पहिल्या आठवड्यापासूनच ही प्रणाली कार्यान्वित होणार आहे. त्यासाठी जिल्हा पुरवठा विभागाने २६०९ पीओएस मशीनची मागणी केल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी सरिता नरके यांनी दिली.
जिल्ह्णात गेल्या काही महिन्यांपूर्वीच वादग्रस्त धान्य घोटाळा झाला होता. हा धान्य घोटाळा तसेच धान्य वितरणातील अनेक त्रुटी लक्षात घेऊन रेशन धान्य वितरण प्रणालीमध्ये सुसूत्रता असावी, यासाठी शासनाने महत्त्वाचे निर्णय घेतले आहे. गरजू लाभार्थींपर्यंत धान्य पोहोचावे व रेशन धान्य वितरणात होणाऱ्या भ्रष्टाचाराला आळा बसावा, या उद्देशाने ही बदल केले आहेत.
याबाबत जिल्हा पुरवठा विभागाच्या तयारीचा आढावा अन्न व पुरवठा विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांनी शनिवारी (दि.२०) व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घेतला. यात नाशिक जिल्ह्णाचा आढावा घेण्यात आला. यावेळी अनेक सूचनाही सचिवांनी केल्या. रेशनिंग व्यवस्थेचे संपूर्ण संगणकीकरण करण्यास शासनाचे प्राधान्य आहे. त्याअंतर्गतच रेशन कार्ड व तत्सम संबंधित सर्व माहिती संगणकांवर अद्ययावत करावयाच्या सूचना यावेळी पुरवठा विभागास देण्यात आल्या. इपीडीएसवर डेटा प्युरिफिकेशनच्या कामास सुरुवात झाली आहे. या प्रणालीचे कामही सुरू असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी सरिता नरके यांनी सांगितले.

Web Title: Grain according to POS system from June

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.