मौजे सुकेने विद्यालयात विद्यार्थ्यांना धान्य वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2020 12:56 PM2020-03-31T12:56:15+5:302020-03-31T12:57:30+5:30
कसबे-सुकेणे : मविप्र संचलित कर्मवीर रावसाहेब थोरात हायस्कूल मौजे सुकेने विद्यालयातील इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सर्व शिक्षा अभियानांतर्गत शासनाकडून प्राप्त झालेल्या अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. या अन्नधान्य मध्ये तांदूळ, मुगडाळ,तुरदाळ ,मटकी ,हरभरा व यांचा समावेश आहे.

या पोषण आहार अंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याला जवळपास - ४ किलो ५०० ग्रॅम तांदूळ, ५०० कि. ग्रॅम मुगडाळ ,१७५ ग्रॅम तुरदाळ, १०० ग्रॅम मटकी व ४०० ग्राम हरभरा याचे ६१२ मुले व ५६० मुली असे एकूण ११७२ विद्यार्थ्यांना या पोषण आहार अंतर्गत धान्याचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक आनंदा शिंदे ,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आचार्य प्रवर महंत सुकेनेकर बाबा , शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.विद्यार्थ्यांना सोशल डिस्टन्स आधारे तोंडाला मास्क किंवा रु माल लावून गर्दी न करता टप्प्याटप्प्याने नियोजन बद्ध वाटप करण्यात आले.