शेकडो एकर द्राक्ष बागांवर कु-हाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2020 01:05 PM2020-03-31T13:05:55+5:302020-03-31T13:06:04+5:30
पाटोदा :- कोरोनाचा सर्वाधिक फटका द्राक्ष उत्पादक शेतकरी वर्गाला बसला आहे.सध्या द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्यात आला असून नेमक्या निर्यातक्षम असणाºया साधारणत: चाळीस टक्के द्राक्षबागा या मजूर व खरेदीसाठी व्यापारी मिळत नसल्याने विक्र ी अभावी तशाच पडून असल्याने शेतकऱ्यांचे कोट्यवधी रु पयांचे नुकसान होणार असल्याने आर्थिक संकट कोसळले आहे.
पाटोदा :- कोरोनाचा सर्वाधिक फटका द्राक्ष उत्पादक शेतकरी वर्गाला बसला आहे.सध्या द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्यात आला असून नेमक्या निर्यातक्षम असणाºया साधारणत: चाळीस टक्के द्राक्षबागा या मजूर व खरेदीसाठी व्यापारी मिळत नसल्याने विक्र ी अभावी तशाच पडून असल्याने शेतकऱ्यांचे कोट्यवधी रु पयांचे नुकसान होणार असल्याने आर्थिक संकट कोसळले आहे. त्यामुळे या भागातील शेतकºयांनी शेकडो एकर द्राक्ष बागांवर कुºहाड चालवित संताप व्यक्त केला आहे. त्यामुळे पाटोदा परिसरातील द्राक्ष शेती धोक्यात आली असून क्षेत्र घटणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
गेल्या चार पाच वर्षांपासून पाटोदा परिसरातील शेतकरी दुष्काळाच्या सावटाखाली जीवन जगत आहे. दुष्काळाचा सामना करीत मिळेल तेथून तीन हजार रु पये एका टँकरसाठी खर्च करून पाणी उपलब्ध करून आपल्या द्राक्ष बागा जगवल्या. यावर्षी निर्यातक्षम द्राक्षबागेसाठी एकरी सुमारे अडीच ते तीन लाखाच्या आसपास खर्च करून द्राक्ष बागा धरल्या . मात्र परतीच्या अवकाळी पावसाने होत्याचं नव्हतं केलं अनेक शेतकर्यांच्या द्राक्ष बागा बाधित झाल्या . अशाही परिस्थितीत शेतकºयांनी पुन्हा बागांवर लाखो रु पये खर्च करीत महागडी औषधे व बुरशीनाशके व इतर किटकनाशकांची फवारणी करून निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन घेतले.आता अंतिम टप्प्यातील द्राक्ष बागांची काढणी सुरु असतांनाच कोरोनाने हाहाकार उडवून दिल्याने संपूर्ण देशात लॉकडाऊन सह संचारबंदी लागू असल्याने तसेच कोरोनाचे सावटामुळे द्राक्ष काढणीसाठी मजूरवर्गव खरेदीसाठी व्यापारी येत नसल्याने शेतकरी वर्ग हतबल झाला असून अगदी निराशेतून शेतकरी पोटच्या मुलांबळाप्रमाणे जीव लावलेल्या द्राक्ष बागेवर जड अंतकरणाने कुर्हाड चालवत त्यांनी बागा भुईसपाट करण्याचा सपाटा लावला आहे .