धान्य विकले मात्र पैशांसाठी करावी लागतेय प्रतिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 12:43 PM2019-01-10T12:43:01+5:302019-01-10T12:43:20+5:30
पेठ -आदिवासी शेतकऱ्यांना आपल्या शेतात पिकवलेले धान्य विक्र ी करण्यासाठी स्थानिक ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समिती नसल्याने आदिवासी विकास महामंडळाच्या एकाधिकार धान्य खरेदी केंद्रावर माल विक्र ी करावा लागत असून आॅनलाईन पेमेंटच्या नावाखाली एक दोन महिन्याचा कालावधी लोटला तरी शेतक-यांच्या खात्यावर मालाचे पैसे जमा होत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
पेठ -आदिवासी शेतकऱ्यांना आपल्या शेतात पिकवलेले धान्य विक्र ी करण्यासाठी स्थानिक ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समिती नसल्याने आदिवासी विकास महामंडळाच्या एकाधिकार धान्य खरेदी केंद्रावर माल विक्र ी करावा लागत असून आॅनलाईन पेमेंटच्या नावाखाली एक दोन महिन्याचा कालावधी लोटला तरी
शेतक-यांच्या खात्यावर मालाचे पैसे जमा होत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
पेठ तालुक्यात महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादित नाशिक २ उप-प्रादेशिक कार्यालय पेठ अंतर्गत तालुक्यातील आदिवासी विविध कार्यकारी संस्था मर्यादित पेठ ,करंजाळी ,कोहोर ,आड बुदरु ख ,जोगमोडी ,हरसूल येथे एकाधिकार पद्धतीने धान्य खरेदी केले जाते.नोहेंबर अखेरीस सुरू झालेल्या तालुक्यातील धान्य खरेदी केंद्रावर स्थानिक शेतकर्?यांनी आपल्या शेतातील धान्य विक्र ी करण्यास सुरु वात मोठ्या आशेने केली. महामंडळाने यावर्षी भाताला चांगला भावही दिला मात्र एक मिहना उलटून गेला तरीही शेतकºयाला त्याने विक्र ी केलेल्या धान्याचे पैसे मिळाले नसून हे पैसे त्यांचे बँक खात्यावर आॅनलाइन पद्धतीने मिळणार असल्याचे त्यांना प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. परंतु २०१८ वर्ष उलटून आता २०१९ चा पहिला आठवडा उलटला असून शेतकरी विक्र ी केलेल्या धान्याचे पैसे आपल्या बँक खात्यावर जमा झाले की नाही हे बघण्यासाठी बँकेचे उंबरठे झजिवत आहे. एकीकडे पावसाने एन वेळी दडी मारल्याने कसेबसे काबाडकस्थ करून धान्य पिकवले असून शासनाडून धान्यास योग्य भाव मिळत नसताना धान्य विक्र ी केले आहे परंतु आता वेळेवर विक्र ी केलेल्या धान्याचे पैसे कधी मिळणार या कडे शेतकºयाचे लक्ष लागून आहे.