सेवा फाउण्डेशनतर्फे धान्यपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2020 10:29 PM2020-04-24T22:29:56+5:302020-04-24T23:45:16+5:30
त्र्यंबकेश्वर : ज्या शिधापत्रिका- धारकांना केशरीकार्ड असून, धान्य मिळत नाहीत, अशा शिधापत्रिका- धारकांना त्र्यंबकेश्वरमधील सेवा फाउण्डेशनने सामाजिक बांधिलकी जपत मदतीचा हात पुढे केला आहे.
त्र्यंबकेश्वर : ज्या शिधापत्रिका- धारकांना केशरीकार्ड असून, धान्य मिळत नाहीत, अशा शिधापत्रिका- धारकांना त्र्यंबकेश्वरमधील सेवा फाउण्डेशनने सामाजिक बांधिलकी जपत मदतीचा हात पुढे केला आहे.
सेवा फाउण्डेशनचे संस्थापक अध्यक्ष येथील माजी प्रभारी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक स्वप्निल शेलार यांच्या संकल्पनेतून फिजिकल डिस्टन्सिंगचा आदर करीत तेलीगल्ली येथे शिधावाटप सुरू केले आहे.
आतापर्यंत ७५० कुटुंबातील व्यक्तींना धान्य देण्यात आले असून, फाउण्डेशनचे उद्दिष्ट साधारण दोन हजार कुटुंबातील व्यक्तींना धान्य पुरविण्याचे आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये असे गरीब शिधापत्रिकाधारक असून, ज्यांना केशरी शिधापत्रिका असून, त्यावर १२ अंकी क्रमांक नसल्याने व त्यावर प्राधान्याने धान्य पुरवठा असा शिक्का नसल्याने व काही शिधापत्रिकांवर नंबर नाही पण नुसता शिक्का आहे नंबर काढूनही निकषात बसत नसल्याने धान्य नाकारण्यात येत आहे. धान्य घेण्याकरिता रेशनकार्ड अत्यावश्यक आहे.
प्रति रेशनकार्ड पाच किलो धान्य मोफत मिळणार आहे. त्र्यंबकेश्वरमधील असे काही नागरिक असतील की ज्यांचे रेशनकार्ड नाही त्यांनी तेली गल्ली येथे सुनील गायकवाड यांच्याशी संपर्क साधावा. या धान्य वाटपास सकाळी दहा वाजता सुरुवात होईल व तीन वाजता बंद करण्यात येईल. धान्य घेण्याकरिता येणाऱ्या नागरिकांनी आपल्या तोंडाला मास्क असणे आवश्यक असल्याचे कळविण्यात आले आहे.