आधारविनाही मिळणार रेशनमधून धान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2018 04:22 AM2018-03-02T04:22:21+5:302018-03-02T04:22:21+5:30

शिधापत्रिकेला आधार जोडल्याशिवाय रेशनमधून धान्य न देण्याचा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने अलीकडे दिला आहे. मात्र ज्यांच्याकडे आधार कार्ड नाही, अशा शिधापत्रिकाधारकाने आपल्या ओळखीचा अन्य कोणताही पुरावा सादर केला, तरीही त्यास धान्य देण्याचा निर्णय राज्याच्या पुरवठा विभागाने घेतला आहे.

Grains from ration will not be available without support | आधारविनाही मिळणार रेशनमधून धान्य

आधारविनाही मिळणार रेशनमधून धान्य

Next

नाशिक : शिधापत्रिकेला आधार जोडल्याशिवाय रेशनमधून धान्य न देण्याचा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने अलीकडे दिला आहे. मात्र ज्यांच्याकडे आधार कार्ड नाही, अशा शिधापत्रिकाधारकाने आपल्या ओळखीचा अन्य कोणताही पुरावा सादर केला, तरीही त्यास धान्य देण्याचा निर्णय राज्याच्या पुरवठा विभागाने घेतला आहे. शिधापत्रिकेवर नाव असलेल्या व्यक्तीचे आधारकार्ड क्रमांक दिल्याशिवाय धान्य न देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र अनेक जिल्ह्यांमध्ये अद्यापही पुरवठा खात्याकडून आधार सिडिंगचे कामकाज पूर्ण झालेले नाही. त्यामुळे १ मार्च २०१८ पासून अकोला, सांगली, अहमदनगर, परभणी, नागपूर, लातूर, उस्मानाबाद, औरंगाबाद व अन्नधान्य वितरण अधिकारी पुणे या आठ ठिकाणी ‘एइपीडीएस’प्रणालीद्वारे म्हणजेच आधार जोडणी असल्याशिवाय धान्य देण्यात येणार नाही, परंतु महाराष्ट्रात नाशिकसह अन्य जिल्'ांत मात्र पूर्वीच्याच पद्धतीने ‘पॉस’ यंत्राच्या सहाय्याने धान्य वितरण करण्यास मुभा दिली आहे.

Web Title: Grains from ration will not be available without support

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.