ग्रामपंचायतीसाठी मतदारांमध्ये जोश, चार तासात ३८ टक्के मतदान

By संदीप भालेराव | Published: September 18, 2022 02:17 PM2022-09-18T14:17:46+5:302022-09-18T14:18:15+5:30

नाशिक जिल्ह्यातील कळवण, दिंडोरी आणि नाशिक तालुक्यातील ८२ ग्रामपंचायतींसाठी सकाळी मतदानाला सुरुवात झाली.

Gram Panchayat 38 percent voting in four hours | ग्रामपंचायतीसाठी मतदारांमध्ये जोश, चार तासात ३८ टक्के मतदान

ग्रामपंचायतीसाठी मतदारांमध्ये जोश, चार तासात ३८ टक्के मतदान

Next

नाशिक:

नाशिक जिल्ह्यातील कळवण, दिंडोरी आणि नाशिक तालुक्यातील ८२ ग्रामपंचायतींसाठी सकाळी मतदानाला सुरुवात झाली. जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरू असतांनाही सकाळपासूनच मतदारांमध्ये उत्साह दिसून आला. पहिल्या दोन तासात १६ टक्के मतदान झाले  तर दुपारी दिड वाजेपर्यंत ३८ टक्के मतदान झाले आहे. 

जिल्ह्यातील ८२ ग्रामपंचायतींसाठी २८४ मतदान केंद्रांवर सकाळी ७.३० वाजेपासून मतदानाला सुरूवात झाली. पावसामुळे मतदानावर काहीसा परिणाम होऊ शकतो अशी शक्यता वर्तविली जात असतांना मात्र सकाळपासूनच मतदान केंद्रांवर मतदारांची रांग लागल्याचे दिसून आले. सकाळी ७.३० वाजता १५.९२ टक्के मतदानाची नोंद झाली तर दुपारी दिड वाजेर्पंत ३८.६३ टक्के इतके मतदान झाले. 

नाशिक तालुक्यातील १६, दिंडारीतील ४६ तर कळवण मधील २० अशा एकुण ८२ ग्रामपंचायतींसाठी मतदानाला सुरूवात झाली. सहा ग्रामपंचायती आगोदरच बिनविरोध झाल्या आहेत.

Web Title: Gram Panchayat 38 percent voting in four hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक