ग्रामपंचायत प्रशासन, व्यापाऱ्यांच्या बैठकीनंतर घोटी बाजारपेठ सुरळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2020 09:46 PM2020-07-26T21:46:05+5:302020-07-27T00:16:09+5:30

नांदूरवैद्य : कोरोनाचावाढता संसर्ग रोखण्यासाठी दोन दिवसांपूर्वी घेण्यात आलेला घोटी बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामपालिका प्रशासन व व्यापारी संघटनेचे पदाधिकारी यांच्यात झालेल्या बैठकीत मागे घेण्यात आला. त्यामूळे नवीन नियमांनुसार घोटी बाजारपेठ पुन्हा सुरळीत सुरु करण्याचे आदेश ग्रामपालिकेचे प्रभारी सरपंच संजय आरोटे यांनी दिले आहेत.

Gram Panchayat administration, Ghoti market smooth after the meeting of traders | ग्रामपंचायत प्रशासन, व्यापाऱ्यांच्या बैठकीनंतर घोटी बाजारपेठ सुरळीत

ग्रामपंचायत प्रशासन, व्यापाऱ्यांच्या बैठकीनंतर घोटी बाजारपेठ सुरळीत

Next
ठळक मुद्देनियम सक्तीचे : शनिवारी व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय

नांदूरवैद्य : कोरोनाचावाढता संसर्ग रोखण्यासाठी दोन दिवसांपूर्वी घेण्यात आलेला घोटी बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामपालिका प्रशासन व व्यापारी संघटनेचे पदाधिकारी यांच्यात झालेल्या बैठकीत मागे घेण्यात आला. त्यामूळे नवीन नियमांनुसार घोटी बाजारपेठ पुन्हा सुरळीत सुरु करण्याचे आदेश ग्रामपालिकेचे प्रभारी सरपंच संजय आरोटे यांनी दिले आहेत.
रविवारी झालेल्या बैठकीत व्यापारी वर्ग व ग्रामपालिकेचे सर्व पदाधिकारी यांच्यामध्ये सकारात्मक चर्चा होऊन घोटी बंदचा निर्णय मागे घेण्यात आला. सदर बैठकीदरम्यान ग्राहक व दुकानदारांनी मास्क वापरणे, दुकानदारांनी सॅनिटायझर दुकानांमध्ये ठेवणे बंधनकारक केले आहे. या बैठकीस जिल्हा परिषद सदस्य उदय जाधव, रामदास भोर, श्रीकांत काळे, व्यावसायिक चांदमल भन्साळी, चंद्रभान गायकवाड, हेमंत सुराणा, विजय पिचा, रमेश पिचा, सुजित राखेचा, नवीन चोपड आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.घोटी येथे रविवारी (दि. २६) झालेल्या ग्रामपालिका व व्यापारी वर्गाच्या बैठकीत दोन दिवसांपूर्वी घोटी ग्रामपालिकेने १५ दिवसांसाठी घोटी बंदचे आदेश देण्यात आले होते. याविषयी घोटी ग्रामपालिकेच्या वतीने नोटीस देखील प्रसिद्ध केली होती. परंतू याआधी देखील घोटी शहर बंद असतांना देखील रु ग्णांची संख्या वाढतच होती. याच पार्श्वभूमीवर घोटी येथील व्यावसायिकांनी या बंदला स्थगिती मिळावी व बाजारपेठ शासकिय नियमांचे पालन करीत सुरळीत सुरु करावी अशी मागणी घोटी ग्रामपालिकेचे प्रभारी सरपंच संजय आरोटे यांच्याकडे केली.

Web Title: Gram Panchayat administration, Ghoti market smooth after the meeting of traders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.