ग्रामपंचायत इमारतीचे लोकार्पण
By admin | Published: July 15, 2017 12:52 AM2017-07-15T00:52:59+5:302017-07-15T00:53:11+5:30
ंमालेगाव : तळवाडे ग्रामस्थांनी हगणदारीमुक्त गाव करावे, परिसरातील गावांनी तळवाडेचा आदर्श घ्यावा, असे आवाहन ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
ंमालेगाव : तळवाडे ग्रामस्थांनी हगणदारीमुक्त गाव करावे, परिसरातील गावांनी तळवाडेचा आदर्श घ्यावा, असे आवाहन ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी केले. तळवाडे येथे १४ व्या वित्त आयोग निधीतून ग्रामपंचायत इमारतीचे उद्घाटन व लोकार्पणप्रसंगी राज्यमंत्री भुसे बेलत होते. प्रथम गावाचे जागृत देवस्थान महंत भामेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी सरपंच समाधान शिरोळे होते. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आनंद पिंगळे यांनीही गाव हगणदारीमुक्त करण्याचे आवाहन केले. ग्रामविकास अधिकारी साहेबराव कोर यांनी प्रास्ताविक केले. गमन सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले. सरपंच समाधान शिरोळे, माजी सरपंच संजय पवार व ग्रामस्थांच्या वतीने गावातील विविध कामांचे निवेदन राज्यमंत्री भुसे यांना देण्यात आले. अंधांमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या दीपाली यादव व तळवाडेत दहावीत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या नेहा पवार यांचा सत्कार राज्यमंत्री भुसे यांनी केला. कार्यक्रमास सहायक गटविकास अधिकारी कासार, शाखा अभियंता अनिल पवार, विस्तार अधिकारी महाले, जावेद शेख, उपसरपंच मंगला केले, सदस्य सुदाम साळुंके, शकुंतला पवार, शोभाबाई जाधव, आक्काबाई अहिरे, साखरबाई शिरोळे, बायजाबाई पवार, युवराज खैरनार, संजय पवार, दिलीप देशमुख, गोरख कापडणीस, रामदास शिरोळे, रवि पवार आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन विश्वनाथ घोरपडे यांनी केले, तर पूजा जाधव यांनी आभार मानले.