ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार थंडावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2017 12:19 AM2017-10-06T00:19:45+5:302017-10-06T00:20:01+5:30
जिल्ह्यातील १७१ ग्रामपंचायतींच्या निवडणूक प्रचाराचा गेल्या महिन्यापासून उडालेला धुराळा गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजता संपुष्टात आला असून, उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी निवडणुकीला सामोरे जाण्याची व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे प्रशासनाचीही तयारी पूर्ण झाल्याने शुक्रवारी मतदान केंद्रांवर साहित्य रवाना होणार आहे.
नाशिक : जिल्ह्यातील १७१ ग्रामपंचायतींच्या निवडणूक प्रचाराचा गेल्या महिन्यापासून उडालेला धुराळा गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजता संपुष्टात आला असून, उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी निवडणुकीला सामोरे जाण्याची व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे प्रशासनाचीही तयारी पूर्ण झाल्याने शुक्रवारी मतदान केंद्रांवर साहित्य रवाना होणार आहे.
नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये मुदत संपणाºया जिल्ह्यातील १७१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला होता. त्यात २८ सप्टेंबर रोजी माघारीसाठी मुदत देण्यात आली होती. जिल्ह्यात नामांकन अर्ज दाखल करतेवेळीच पाच ग्रामपंचायतींच्या सदस्य व सरपंचांची बिनविरोध निवड करण्यात आल्याने १६६ ग्रामपंचायतींच्या ५९३ प्रभागांतून १६४७ सदस्य निवडून द्यायचे आहेत. त्यासाठी रिंगणात फक्त २१४० उमेदवार शिल्लक राहिले आहेत. सरपंचपदासाठी देखील जनतेतूनच निवड करण्यात येणार असल्याने त्यासाठीदेखील शनिवार दि. ७ आॅक्टोबर रोजीच मतदान घेण्यात येणार आहे. माघारीच्या दिवशीच २५ जागांवर सरपंचांची बिनविरोध निवड करण्यात आली असली तरी, १४६ जागांसाठी ४७३ उमेदवार रिंगणात आहेत.