Gram Panchayat Election Result: निरगुडेच्या सरपंचपदी बेबीनंदा खंबाईत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2022 01:56 PM2022-12-20T13:56:38+5:302022-12-20T14:02:15+5:30

Gram Panchayat Election Result: पेठ तालुक्यातील बहुचर्चित निरगुडे(क) ग्रामपंचायतीच्या भेट सरपंचपदी बेबिनंदा सुरेश खंबाईत याची निवड झाली आहे. सरपंचपदाच्या शर्यतीत चार उमेदवार होते. सातपैकी सहा सदस्य बिनविरोध निवडून आल्याने केवळ सरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली.

Gram Panchayat Election Result: Sarpanchpadi Babinanda Khambait of Niragude | Gram Panchayat Election Result: निरगुडेच्या सरपंचपदी बेबीनंदा खंबाईत

Gram Panchayat Election Result: निरगुडेच्या सरपंचपदी बेबीनंदा खंबाईत

googlenewsNext

- चेतन ठाकरे
नाशिक  - पेठ तालुक्यातील बहुचर्चित निरगुडे(क) ग्रामपंचायतीच्या भेट सरपंचपदी बेबिनंदा सुरेश खंबाईत याची निवड झाली आहे. सरपंचपदाच्या शर्यतीत चार उमेदवार होते. सातपैकी सहा सदस्य बिनविरोध निवडून आल्याने केवळ सरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली. यामध्ये बेबिनंदा खंबाईत यांना सर्वाधिक २९८ मते मिळाली तर कैलास विठोबा भोये यांना २८३,पुंडलिक कोंडू भुसारे यांना १७० तर मयूर चिंतामण खंबाईत यांना ६१ मते मिळाली. दोन मतदारांनी नोटाला पसंती दिली.सरपंच पदावर निवडून आलेल्या बेबीनंदा खंबाईत या प्रभाग ३ मधून बिनविरोध सदस्य पदावरही निवडून आल्याने भविष्यात यापूर्वीची एक रिक्त जागा व आताची एक अशा दोन सदस्य पदासाठी पोटनिवडणूक घ्यावी लागणार आहे. निकालानंतर नवनिर्वाचित सरपंच कोणत्या राजकीय पक्षाच्या पारड्यात जातात हे येणाऱ्या काळात दिसून येणार आहे. बेबीनंदा खंबाईत या दुसऱ्यांदा निरगुडे ग्रामपंचायत सरपंचपदी विराजमान झाल्या आहेत.

Web Title: Gram Panchayat Election Result: Sarpanchpadi Babinanda Khambait of Niragude

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.