सौंदाणेतील बाधितांचा तपासणी खर्च ग्रामपंचायत करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:09 AM2021-05-03T04:09:49+5:302021-05-03T04:09:49+5:30

सौदाणे गाव मागील एक वर्षांपासून कोरोना महामारीशी लढा देत आहे सुरुवातीच्या काळात खूप काळजी घेऊन गावातील रुग्णसंख्या आटोक्यात ...

The Gram Panchayat will bear the cost of inspection of the affected persons | सौंदाणेतील बाधितांचा तपासणी खर्च ग्रामपंचायत करणार

सौंदाणेतील बाधितांचा तपासणी खर्च ग्रामपंचायत करणार

googlenewsNext

सौदाणे गाव मागील एक वर्षांपासून कोरोना महामारीशी लढा देत आहे सुरुवातीच्या काळात खूप काळजी घेऊन गावातील रुग्णसंख्या आटोक्यात ठेवली होती. मात्र दुसऱ्या लाटेत गावातील रुग्णसंख्या वाढली. काही लोकांचा मृत्यू झाला. बरेच रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर देखील असे बाधित बरेच दिवस उपचार न करता घरी राहिले. जेव्हा उपचारासाठी कोविड सेंटरमध्ये दाखल झाले तेव्हा त्यांचा एचआरसीटी स्कोर जास्त होता. दवाखान्यात उपचार करायचे की विलगीकरणात राहून उपचार करायचे याचा विचार करणे गरजेचे आहे. त्यामुळे सौंदाणे ग्रामपंचायतीने बाधितांचा एचआरसीटी स्कॅन करण्याचा निर्णय घेतला. त्याचा लागणारा खर्च ग्रामपंचायतीने उचलावा, असा ठराव करण्यात आला. जेणेकरून रुग्णांना लवकर दाखल करून उपचार करणे सोपे जाईल. पुढील जे धोके टळतील. आपण आपल्या प्रियजनांना सुरक्षित ठेवू शकू.

यासाठी लागणारा खर्च सरपंच सहायता निधीतून केला जाईल. या निधीसाठी सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांनी त्यांचे सर्व वर्षभराचे वेतन दिले आहे तसेच गावातील काही दानशूर आर्थिक मदत करीत आहेत, असे शेवटी पत्रकात म्हटले आहे.

Web Title: The Gram Panchayat will bear the cost of inspection of the affected persons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.