ग्रामपंचायत करणार थकबाकीदारांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 12:42 PM2020-02-12T12:42:36+5:302020-02-12T12:42:45+5:30
लोहोणेर : येथील ग्रामपंचायत हद्दीत वास्तव्यास असलेल्या घरपट्टी, पाणीपट्टी व जागाभाडे थकबाकीदारांना कडक कारवाई करण्याचा इशारा प्रशासनातर्फे देण्यात आला आहे.
लोहोणेर : येथील ग्रामपंचायत हद्दीत वास्तव्यास असलेल्या घरपट्टी, पाणीपट्टी व जागाभाडे थकबाकीदारांना कडक कारवाई करण्याचा इशारा प्रशासनातर्फे देण्यात आला आहे.
थकबाकीदाराना ग्रामपंचायतीच्यावतीने लोकन्यायालयाच्या मार्फत पाच ते सहा वेळा घरपोच नोटीसा देऊनही ज्या थकबाकीदारांनी थकबाकी अद्याप भरलेली नाही. अशा थकबाकीदारांनी येत्या १७ फेब्रुवारीपर्यत थकबाकी न भरल्यास १८ फेब्रुवारीपासून संबंधिताचें पिण्याच्या पाण्याचे नळ जोडण्या खंडित करण्यात येणार आहे. असे सरपंच जयवंता बच्छाव व ग्रामविकास अधिकारी यु. बी.खैरनार यांनी दिला आहे. याबाबत ग्रामपंचायतीने दिलेली माहिती अशी की, लोहोणेर ग्रामपंचायतीची ३१ मार्च २०१९ अखेर सुमारे १३,७५, ८५८ रु पये घरपट्टी व ५,५३,६१२ रु पये पाणीपट्टी थकबाकी आहे. सदरची घरपट्टी थकबाकी ही २०७ जणांकडे एक वषापेक्षा जास्त कालावधी पासून थकीत आहे. तर १७७ खातेदारांकडे एक वर्षाची थकीत बाकी येणे आहे. या थकीत येणे बाकी वसुलीसंदर्भात नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत चर्चा होऊन वसुली बाबत ठोस पावले उचलणे गरजेचे आहे असा ठराव अर्जुन लाला शेवाळे यांनी सूचक म्हणून मांडला. त्यास माजी सरपंच अशोक अलई यांनी अनुमोदन दिले. ग्रामपंचायतीच्या मार्फत होणाऱ्या लिलावात सहभागी झालेल्या लिलाव धारकाकडे ३१ मार्च २०१९ पर्यत सुमारे १३,९३,६०० रु पये थकबाकी आहे. या थकबाकी संदर्भात ग्रामपंचायतीच्या वतीने लाऊड स्पिकर लावून गावात आवाहन करण्यात येणार आहे. तसेच सदरची थकबाकी ग्रामपंचायतीकडे जमा न केल्यास थकबाकीदाराची नांवे डिजिटल बोर्डावर झळकविण्यात येणार आहेत. ज्या थकबाकीदाराकडे ग्रामपंचायतीची घरपट्टी, नळपट्टी अथवा जगाभाडे थकीत आहे अशा थकबाकीदारांनी येत्या १७ तारखेच्या आत आपली थकबाकी ग्रामपंचायत कार्यालयात येऊन भरून द्यावी अन्यथा अशा थकबाकीदाराचे नळ जोडण्या खंडित करण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला असून या बाबत कडक कारवाई करण्यात येणार आहे. असे आवाहन करण्यात आले आहे.
------------------------------------
लोहोणेर ग्रामपंचायतीच्या थकबाकीदारामध्ये वसंत दादा पाटील सहकारी साखर कारखान्याकडे मोठ्या प्रमाणावर थकबाकी असून वसाकाकडे १५,१९,२४८ रु पये मागील थकबाकी व ११,६१, ३१३ रु पये चालू थकबाकी अशी एकूण २६,८०, ५६१ रु पये सन २०१९-२० पर्यत थकीत रक्कम आहे. तर ग्रामपंचायतीचे ७६,७७० रु पये जागा भाडेही संबंधितांकडे थकीत आहे