नाशिक तालुक्यातील ग्रामपंचायतीत महिलांचा बोलबाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 12:23 AM2019-03-27T00:23:15+5:302019-03-27T00:23:31+5:30

नाशिक तालुक्यातील चांदशी, पिंपळद, दरी आणि राहुरी या चार ग्रामपंचायतींच्या २८ सदस्यपदांसह चार थेट सरपंचपदासाठी झालेल्या निवडणुकीची सोमवारी मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात आले.

 Gram panchayat women in Nashik taluka dominated women | नाशिक तालुक्यातील ग्रामपंचायतीत महिलांचा बोलबाला

नाशिक तालुक्यातील ग्रामपंचायतीत महिलांचा बोलबाला

Next

गंगापूर : नाशिक तालुक्यातील चांदशी, पिंपळद, दरी आणि राहुरी या चार ग्रामपंचायतींच्या २८ सदस्यपदांसह चार थेट सरपंचपदासाठी झालेल्या निवडणुकीची सोमवारी मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात आले. यामध्ये प्रस्थापितांना मोठा धक्का बसून नवीन चेहऱ्यांना संधी मिळाली. या निवडणुकीत पहिल्यांदाच महिलांचा बोलबाला दिसून आला. प्रथमच थेट जनतेतून सरपंचपदी निवडून आलेल्यांमध्ये चांदशी- साळूबाई विश्राम कचरे (अनु. जमाती स्री), दरी- अलका अंबादास गांगोडे (अनु. जमाती स्री), पिंपळद (ना.)- अलका भाऊसाहेब झोंबाड (अनु. जमाती), राहुरी- संगीत संपतराव घुगे (सर्वसाधारण) याप्रमाणे चारही ग्रामपंचायतीत थेट जनतेतून सरपंच म्हणून निवडून आले आहेत.
चांदशी ग्रामपंचायतीत सदस्यपदी राहुल दौलत पाटील (ना. मा. प्रवर्ग), भगवान सदू धोंगडे (अनु. जमाती), अंजना नामदेव खराटे (अनु. जमाती स्री),परशराम हरी गारे (अनु. जमाती), म्हाळसाबाई हिरामण केंग (अनु. जमाती स्री), गोदावरी चैतन्य गायकर (सर्वसाधारण स्री), सोनाली योगेश कचरे (अनु. जमाती स्री), अरुण दगडू रोकडे (अनु. जाती), विमल हरीश गुळवे (सर्वसाधारण स्री) हे विजयी झाले. पिंपळद (ना.) ग्रामपंचायतीत सदस्य म्हणून राजाराम नामदेव झोंबाड (अनु. जमाती), अरुण बालाजी खांडबहाले (सर्वसाधारण), साधना नितीन घोलप (सर्वसाधारण स्री), नारायण धर्मा पावडे (अनु. जमाती), गीता तानाजी चहाळे (अनु. जमाती स्री), संजय दशरथ पावडे (अनु. जमाती), संगीता अंकुश बेंडकुळे (अनु. जमाती स्री), निर्मला विलास कड (ना. मा. प्रवर्ग स्री), अश्विनी राजाराम झोंबाड (अनु. जमाती स्री), संजय भावका अनार्थे (सर्वसाधारण) गटातून निवडून आले आहेत.
वर्चस्व : दिग्गजांनी गमावली पत
नाशिक तालुक्यातील या चारही ग्रामपंचायतींच्या निवडणुका पक्षीय चिन्हावर लढविल्या गेल्या नसल्याने कोणत्या पक्षाच्या ताब्यात सत्ता गेली याबाबत संभ्रमाचे चित्र आहे. असे असले तरी निकालाचा कल पाहिल्यास अनेक ग्रामपंचायतीत राजकीय उलथापालथ झाली आहे. मतमोजणीमध्ये अनेक दिग्गजांना आपली पत गमवावी लागली. तर काहींनी आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले.
निकालानंतर ढोल-ताशांच्या गजरात गुलालाची मुक्त उधळण करीत जल्लोष केला गेला. सरपंचपदाचे उमेदवार पक्षाचे चिन्ह न घेता प्रथमच जनतेतून निवडून आल्याने ग्रामपंचायतीवर सत्ता नेमकी कुणाची, यावरून संभ्रम निर्माण झाला आहे. नाशिकचे तहसीलदार अनिल दौंडे यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी शांततेत पार पडली.
या निवडणुकीवर लोकसभा अचारसंहितेचे सावट असल्याने अनेक ग्रामपंचायतींना विजयानंतर मिरवणूक काढता आली नाही; मात्र काही ठिकाणी मिरवणुकीद्वारे जल्लोष करण्यात आला.

Web Title:  Gram panchayat women in Nashik taluka dominated women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.