ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत सोनाली रानडे विजयी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 12:30 AM2019-06-25T00:30:42+5:302019-06-25T00:31:01+5:30
नाशिक तालुक्यातील जलालपूर ग्रामपंचायतीच्या एक जागेसाठी झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी पॅनलच्या सोनाली मोतीराम रानडे यांनी भरघोस मतांनी बाजी मारीत विरोधी पॅनलच्या सीताबाई मधुकर मोंढे यांचा दणदणीत पराभव केला.
गंगापूर : नाशिक तालुक्यातील जलालपूर ग्रामपंचायतीच्या एक जागेसाठी झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी पॅनलच्या सोनाली मोतीराम रानडे यांनी भरघोस मतांनी बाजी मारीत विरोधी पॅनलच्या सीताबाई मधुकर मोंढे यांचा दणदणीत पराभव केला.
नाशिक तालुक्यातील संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागलेल्या जलालपूर ग्रामपंचायतीच्या वार्ड नंबर एकच्या एका जागेसाठी निवडणूक घेण्यात आली. यासाठी दोन उमेदवारांनी अर्ज भरला होता. माजी सरपंच रमेश डंबाळे यांच्या पॅनलच्या सीताबाई मधुकर मोंढे आणि भगवान गभाले यांच्या पॅनलच्या सोनाली मोतीराम रानडे यांच्यापैकी सत्ताधारी पॅनलच्या सोनाली रानडे यांनी २३५ मते मिळवून विजय मिळविला, तर सीताबाई मोंढे यांना १२० मतावर समाधान मानावे लागले.
वर्षभरात गावातील झालेल्या विविध विकासकामांमुळे स्थानिक ग्रामस्थांनी विजयाची माळ आमच्या पॅनलच्या उमेदवारावर टाकल्याचे जलालपूरचे सरपंच हिराबाई भगवान गभाले यांनी बोलताना सांगितले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य भगवान गभाले, सोनाली गुंबाडे, मंदा गभाले, प्रकाश जाधव, महंत भगवानदास खाकी आदी उपस्थित होते. जलालपूरला विजयाची बातमी मिळताच एकच आनंद उत्सव साजरा करण्यात आला. या संपूर्ण निवडणुकीचे कामकाज निवडणूक निर्णय अधिकारी राहुल काळे आदींनी पाहिले. तलाठी मॅडम, पोलीसपाटील पप्पू मोहिते, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.