गाळ काढण्याच्या कामात वटार ग्रामपंचायतीचा पुढाकार
By admin | Published: June 4, 2016 10:01 PM2016-06-04T22:01:29+5:302016-06-04T23:57:50+5:30
गाळ काढण्याच्या कामात वटार ग्रामपंचायतीचा पुढाकार
वटार : येथे लोकसहभागातून बांधण्यात आलेल्या सुकड नाला धरणातील गाळ व खोलीकरण करण्यासाठी लोकसहभाग व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यामानाने गाळ काढण्याचे काम सुरु करण्यात आले. या कामाचे उद्घाटन सरपंच प्रशांत बागुल यांच्या हस्ते करण्यात आले.
लोकसहभागातून स्वखर्चाने जेसीबी मशीन,इंधन व शेतकर्यांनी ट्रकटर्स, उपलब्ध करून दिल्याने सुकड नाला लागत बांधण्यात आलेल्या धरणाचे गाळ काढण्याचेकाम पावसाळा जवळ आल्याने युद्धपातळीवर सुरु करण्यात आले. धरणातील गाळ काढल्यामुळे धरणाचीखोली वाढणार असून पाण्याच्या साठवण क्षमतेत वाढ होणार असून, परिसरातील बागायती क्षेत्राला त्याचा
फायदा होणार आहे. परिसरातील सिंचनाचा प्रश्न सुटण्यास मद्दत होणार आहे. सद्या वटार परिसरात पिण्याच्या पाण्याची परिस्थिती
बिकट झाल्याने शेतकर्यांनी स्वखर्चातून गाळ काढण्याचा निर्णय घेतला याचा फायदा पावसाळ्यात धरण भरल्याने होईल असे
सततच्या दुष्काळाचा सामना करत असलेला बळीराजा शासनाच्या कोणत्याही निधीची वाट न पाहता लोकसहभागातून धरणाचे गाळ काढण्याचे काम सुरु केले, शासन पातळीवर पाण्याचे कोणतेही नियोजन नसल्याने पावसाचे पाणी वाहून जाते, तेच पाणी छोटे छोटे धरण बांधून अडकवले तर परिसरातील पिण्याचा पाण्याचा व शेतीलाही त्याचा फायदा होईल. यावेळी उपसरपंच पोपट खैरनार, युवा नेते अनिल पाटील, माजी सरपंच रामदास खैरनार, सावित्रीबाई फुले पाणी वाटप सौस्थेचे अध्यक्ष बाळू खैरनार, मुख्याध्य्पक पी. के. खैरनार, राजेंद्र बागुल, हिरामण खैरनार, कृषी सहाय्यक सोनवणे आदींसह मान्यवर उपस्थित होते.