महावितरणकडे ग्रामपंचायतीची भाडेपट्टी थकीत; तरी वीज केली खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 10:19 PM2021-09-18T22:19:30+5:302021-09-18T22:19:51+5:30

कळवण : महावितरण कंपनीकडे ओतूर वीज उपकेंद्राच्या भाडेपट्टीपोटी ग्रामपंचायतीची नऊ लाख रुपये गेल्या अनेक दिवसांपासून थकबाकी आहे. पत्रव्यवहार करूनदेखील महावितरण थकबाकी भरत नाही. मात्र ग्रामपंचायतकडे महावितरणने वीज थकबाकीचे कारण देत पथदीप वीजपुरवठा खंडित केल्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून गावात अंधार असल्यामुळे उत्सवात तरी गावात रात्रीचा वीजपुरवठा सुरळीत करा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Gram Panchayat's lease to MSEDCL is exhausted; However, the power was cut off | महावितरणकडे ग्रामपंचायतीची भाडेपट्टी थकीत; तरी वीज केली खंडित

महावितरणकडे ग्रामपंचायतीची भाडेपट्टी थकीत; तरी वीज केली खंडित

Next
ठळक मुद्देवीज पुरवठा खंडीत केल्याने गाव 8 दिवसापासून अंधारात

कळवण : महावितरण कंपनीकडे ओतूर वीज उपकेंद्राच्या भाडेपट्टीपोटी ग्रामपंचायतीची नऊ लाख रुपये गेल्या अनेक दिवसांपासून थकबाकी आहे. पत्रव्यवहार करूनदेखील महावितरण थकबाकी भरत नाही. मात्र ग्रामपंचायतकडे महावितरणने वीज थकबाकीचे कारण देत पथदीप वीजपुरवठा खंडित केल्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून गावात अंधार असल्यामुळे उत्सवात तरी गावात रात्रीचा वीजपुरवठा सुरळीत करा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

दरम्यान, महावितरणने सबस्टेशनची भाडेपट्टी सहा लाख रुपये ग्रामपंचायतीच्या कार्यालयात जमा करून ग्रामपंचायतीला सहकार्य करावे. महावितरणने थकबाकी भरल्यानंतर ग्रामपंचायत लगेच थकबाकी भरण्यास तयार असल्यामुळे त्यांनी सहकार्याची भूमिका घ्यावी. महावितरणनेदेखील ग्रामपंचायतीची सहा लाख रुपये थकबाकी द्यावी; नाही तर वीज उपकेंद्राला टाळे ठोकू, असा इशारा दिगंबर पवार, ज्ञानेश्वर पवार यांनी दिला आहे.
ओतूर ग्रामपंचायतीचे वीज बिल नऊ लाख रुपये थकल्याने महावितरण कंपनीने वसुलीच्या नावाखाली गणेशोत्सवाच्या कालावधीत पथदिपांचा वीजपुरवठा खंडित केल्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून गाव अंधारात आहे. त्यामुळे गणेशोत्सव हा धार्मिक उत्सव महावितरणमुळे ग्रामस्थांना अंधारात साजरा करावा लागला. ग्रामपंचायतीकडे पाणीपुरवठा योजनेची थकबाकी असून चालू महिन्याचे वीज बिल आठ हजार २०० रोख भरणा करून महावितरणने गावाला सहकार्य केल्यामुळे गावात पाणीपुरवठा सुरळीत आहे.

मात्र पथदीप बंद असल्याने गावात रात्रभर अंधार असतो. त्यामुळे रात्री-अपरात्री ग्रामस्थांना घराबाहेर पडणे मुश्कील झाले आहे. शेतात जाणेही कठीण झाले आहे. संपूर्ण रात्र गावात अंधार असल्याने गावात स्मशानशांतता पसरते. गावातील भटक्या कुत्र्यांची व सध्या पावसाळा असल्यामुळे सरपटणाऱ्या प्राण्याची भीती वाढली आहे.
अंधाराचा फायदा घेत चोरटेही सक्रिय होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे ग्रामस्थांची अडचण ओळखून महावितरण कंपनीने तत्काळ ग्रामपंचायतीचा पथदीप वीजपुरवठा सुरळीत करून गावातील अंधार घालवावा, अशी मागणी सरपंच पार्वता गांगुर्डे, उपसरपंच मंगेश देसाई, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी केली आहे.

ग्रामपंचायतीने पाणीपुरवठा योजनेचे नियमित वीज बिल भरले आहे. त्यामुळे गावाला पाणीपुरवठा सुरळीत सुरू आहे. ग्रामपंचायतीकडे महावितरणची नऊ लाख रुपये थकबाकी आहे. महावितरण कंपनीकडे ग्रामपंचायतीची सबस्टेशनची भाडेपट्टी सहा लाख रुपये थकबाकी आहे. याबाबत नियमित पत्रव्यवहार केला आहे. थकबाकी मिळाल्यानंतर वीज बिल बाकीत भरणा केला जाईल.
पार्वता गांगुर्डे, सरपंच, ओतूर.

Web Title: Gram Panchayat's lease to MSEDCL is exhausted; However, the power was cut off

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.