लोकसभेबरोबर उडणार ग्रामपंचायतींचाही बार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 12:02 AM2018-06-10T00:02:46+5:302018-06-10T00:02:46+5:30
नाशिक : पुढच्या वर्षी होणाऱ्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीबरोबरच आॅक्टोबर २०१८ ते सप्टेंबर २०१९ या कालावधीत मुदत संपणाºया राज्यातील ग्रामपंचायतींच्याही निवडणुका आटोपण्याचा विचार राज्य निवडणूक आयोग करीत असून, त्यासाठी ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. साधारणत: मुदत संपण्यापूर्वी एक ते दोन महिने अगोदर ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेतल्या जातात, परंतु आयोगाची तयारी पाहता या निवडणुका सहा महिने अगोरद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

राज्य आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार आॅक्टोबर २०१८ ते सप्टेंबर २०१९ या काळात मुदत संपणाºया ग्रामपंचायतींमध्ये नाशिक जिल्ह्णातील १४४ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. त्यात इगतपुरी तालुक्यातील सर्वाधिक ८० ग्रामपंचायतींचा समावेश आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार सोमवार १८ जून रोजी तहसीलदार गुगल मॅपिंगद्वारे गावांचे नकाशे अंतिम करतील.
तलाठी व ग्रामसेवक २५ जूनला संबंधित गावांमध्ये जाऊन प्रारूप प्रभागरचना करतील. तलाठ्यांनी तयार केलेल्या प्रारूप रचनेला तहसीलदार मान्यता देतील. संबंधित ग्रामपंचायतींची ७ जुलै रोजी विशेष ग्रामसभा बोलवून त्यात प्रभागांसाठीचे आरक्षण काढतील. दरम्यान, ११ जुलैला प्रभागरचना व आरक्षण प्रसिद्ध करण्यापूर्वी तहसीलदार जिल्हाधिकारी कार्यालयाकडून असे प्रस्ताव प्राप्त करून त्याची तपासणी करून आवश्यक त्या दुरुस्त्या करतील. १२ जुलै रोजी तहसीलदाºयांच्या अध्यक्षतेखालील समिती दुरुस्त्यांसह प्रारूप प्रभागरचनेला मान्यता देतील.
प्रारूप प्रभागरचनेवर १३ ते २० जुलै याकाळात हरकती व सूचना नोंदविता येतील. प्राप्त हरकतींंवर दि. २१ रोजी प्रांतधिकाºयांकडे सुनावणी होईल. त्यानंतर संबंधित हरकती व सूचना अंतिम अभिप्रायासाठी जिल्हाधिकाºयांकडे ३१ जुलैला सादर केले जाईल. जिल्हाधिकारी हे प्राप्त झालेले प्रस्ताव हे ६ आॅगस्टपर्यंत तपासून घेतील. तसेच ९ आॅगस्टला जिल्हाधिकाºयांनी मान्य केलेले अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर मतदार यादीचा कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे.
निवडणूक होणाºया ग्रामपंचायती
नाशिक - ४, पेठ- १, त्र्यंबकेश्वर- १८, दिंडोरी-१, इगतपुरी-८, निफाड-२२, येवला-३, मालेगाव-१, नांदगाव-२, कळवण-१०, बागलाण-१, देवळा-१