मुंगसरे गावात व्हॉटस अ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून ग्रामसभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 06:35 PM2020-07-11T18:35:26+5:302020-07-11T18:45:14+5:30

मातोरी : मुंगसरे गावात सोशल मीडियाचा योग्य वापर करीत व्हॉटस अ‍ॅपच्या माध्यमातून ग्रामसभा घेतली जात आहे. त्यामुळे कोरोना काळातही ...

Gram Sabha in Mungsare village through WhatsApp group | मुंगसरे गावात व्हॉटस अ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून ग्रामसभा

मुंगसरे गावात व्हॉटस अ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून ग्रामसभा

googlenewsNext
ठळक मुद्देसोशल मीडियाच्या वापरातून गावाच्या विकासाला चालनाअनोख्या योजनेचे कौतुक

मातोरी : मुंगसरे गावात सोशल मीडियाचा योग्य वापर करीत व्हॉटस अ‍ॅपच्या माध्यमातून ग्रामसभा घेतली जात आहे. त्यामुळे कोरोना काळातही गावाचा विकास थांबला नसल्याने या अनोख्या योजनेचे कौतुक केले जात आहे.

 सोशल मीडियाचा सध्या मोठा वापर होत असून, तरु णांच्या हातातील मोबाइल हे फक्त करमणुकीचे साधन बनू लागले आहे, जो तो मोबाइल वापरावर ओरडत असताना गावच्या विकासाला चालना देण्याचे काम हे मध्यम करू शकते, असे मुंगसरे गावातील तरु णांनी साध्य करून दाखविले आहे. मुंगसरे येथील काही तरु णांनी गावातील समस्यासाठी ग्रामविकास संवाद मंच नावाचा व्हाट््स अ‍ॅप ग्रुप बनवित गावातील सर्वच ग्रामस्थांना घेत समस्या टाकण्याचे आवाहन केले आणि त्यावर ग्रामपंचायत ने अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली यामुळे कामेही झाली आणि सामाजिक अंतराचे पालनही झाले. याचा परिणाम म्हणजे गैरहजर असलेले शासकीय कर्मचारी हजर राहू लागले, तसेच विविध विकासकामे मार्गी लागत आहे. गटारी साफ झाल्या, गर्दी न होता कामे पूर्ण झाली. यामुळे गावातील ग्रामस्थ व ग्रामपंचायत यात कोणताही वाद न समन्वय साधल्याने गावातून सत्ताधारी आणि विरोधक एक जुटीने गावाच्या कार्यात जुंपल्याचे दिसत आहे. याशिवाय याच माध्यमातून ग्रामसभा राबविली जात आहे. व्हॉट््स अ‍ॅप माध्यमाचा असा चांगला वापर सर्वांच्या चर्चेचा विषय होत असून, परिसरातील अन्य गावांतही कोरोना काळात ग्रुप बनविण्याच्या कल्पना राबविल्या जात आहेत.
कोरोना काळात गावात विकासकामे करावी, अशी मागणी होती, पण गर्दी नको व संसर्ग होऊ नये म्हणून लोकांनी ग्रामपंचायत कार्यालयाकडे पाठ फिरविली होती. अनेक कर्मचारी तर गावात येतच नसायचे आता ग्रुपमुळे सर्व जागरूक झाले व समस्या ग्रुपवर पाठवू लागल्याने कामे होऊ लागले त्यामुळे ग्रुपचा उद्देश साध्य होऊ लागला.

Web Title: Gram Sabha in Mungsare village through WhatsApp group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.