बाभुळगावचा ग्रामसेवक लाचलुचपतच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:15 AM2021-01-23T04:15:07+5:302021-01-23T04:15:07+5:30
येवला : तालुक्यातील बाभुळगाव येथील ग्रामसेवक रावसाहेब कारभारी वानखेडे यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लाच घेण्याच्या प्रयत्नात अटक केली ...
येवला : तालुक्यातील बाभुळगाव येथील ग्रामसेवक रावसाहेब कारभारी वानखेडे यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लाच घेण्याच्या प्रयत्नात अटक केली आहे.
नाशिक येथील साई राम इलेक्ट्रिक वर्क्स यांचेकडे बाभुळगाव येथील १२ मीटर उंचीच्या हायमास्ट वीज खांब कामाच्या मोबदल्यात ग्रामसेवक वानखेडे याने दहा टक्के रक्कम मागितली होती. यात तडजोड होऊन ५० हजार रुपये लाचेची मागणी केली. सदर रक्कम स्वीकारण्याच्या प्रयत्नात ग्रामसेवक वानखेडे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात सापडला. ग्रामसेवक रावसाहेब कारभारी वानखेडे यास ताब्यात घेऊन शहर पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक नाशिक विभागाचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अप्पर पोलीस अधीक्षक नीलेश सोनवणे, उपाधीक्षक दिनकर पिंगळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे, पोलीस निरीक्षक उज्वलकुमार पाटील, पोलीस नाईक अजय गरुड, परसराम जाधव, किरण आहेर, पोलीस शिपाई विनोद शिंपी आदींच्या पथकाने सदर कारवाई केली.