ग्रामपंचायत हायटेकसाठी ग्रामसेवकाची आडकाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 12:06 AM2017-09-28T00:06:49+5:302017-09-28T00:06:49+5:30

ग्रामपंचायतींचा कारभार आता ‘हायटेक’ होत असल्याने या माध्यमातून गावागावांमध्ये आता ‘ग्लोबल व्हिलेज’ची सेवा सुरू झाली आहे. व्हीडीओ कॉन्फरन्सची सुविधादेखील पुढील काळात या माध्यमातून उपलब्ध होणार असल्याचे चित्र असून, सरपंच ग्रामपंचायत कार्यालयातूनच थेट मंत्रालयाशी संपर्क साधणार असल्याने त्या दिशेने पावले उचलली जात असताना कळवण या आदिवासी तालुक्यातील धार्डेदिगर ग्रामपंचायत हायटेक करण्यासाठी चक्क ग्रामसेवकच आडकाठी करत असल्याची तक्रार उपसरपंच काशीनाथ बहिरम यांनी कळवण पंचायत समितीकडे केली आहे.

 Gramsevak slogan for gram panchayat hi-tech | ग्रामपंचायत हायटेकसाठी ग्रामसेवकाची आडकाठी

ग्रामपंचायत हायटेकसाठी ग्रामसेवकाची आडकाठी

Next

कळवण : ग्रामपंचायतींचा कारभार आता ‘हायटेक’ होत असल्याने या माध्यमातून गावागावांमध्ये आता ‘ग्लोबल व्हिलेज’ची सेवा सुरू झाली आहे. व्हीडीओ कॉन्फरन्सची सुविधादेखील पुढील काळात या माध्यमातून उपलब्ध होणार असल्याचे चित्र असून, सरपंच ग्रामपंचायत कार्यालयातूनच थेट मंत्रालयाशी संपर्क साधणार असल्याने त्या दिशेने पावले उचलली जात असताना कळवण या आदिवासी तालुक्यातील धार्डेदिगर ग्रामपंचायत हायटेक करण्यासाठी चक्क ग्रामसेवकच आडकाठी करत असल्याची तक्रार उपसरपंच काशीनाथ बहिरम यांनी कळवण पंचायत समितीकडे केली आहे. ग्रामसेवकाच्या मनमानीमुळे धार्डेदिगर कार्यालय शोेचे बाहुले बनले आहे. धार्डेदिगर ग्रामपंचायत कार्यालयात कारभार हलविण्यात ग्रामसेवक राजी नसल्याने हायटेक सुविधांपासून ग्रामस्थांना वंचित रहाण्याची वेळ आली आहे. जुन्या ठिकाणांवरून ग्रामपंचायतीचे कामकाज सुरू असल्याने बहिरम यांनी गटविकासाधिकारी एम.डी. बहीरम यांच्याकडे तक्र ार दाखल केली आहे.
पत्रव्यवहार नाही
जयदर येथून धार्डेदिगर ग्रामपंचायत कार्यालयासाठी आॅनलाइन केबल टाकण्याचे काम सुरू झाले असताना पाडगण (वरचापाडा) येथे काम थांबविण्यात आले. नाशिक येथील दूरसंचार कार्यालयाशी सदर कामासंदर्भात चौकशी केली असता, धार्डेदिगर ग्रामपंचायत कार्यालयांपर्यंत आॅनलाइन केबल टाकण्यासाठी ग्रामसेवकांचा पत्रव्यवहार नसल्याने काम पूर्ण करता येणार नसल्याचे संबधितांनी सांगितले.
ग्रामपंचायत हायटेकचे फायदे
 ग्रामसभेचे कामकाज, यातील ठराव, सदस्य बैठक, प्रोसिडिंग बुकांची नोंद यासह दाखले, उतारेही तत्काळ मिळतात. ग्रामस्थांना उतारे, दाखले तत्काळ मिळतील व गाव इंटरनेटच्या माध्यमातून जिल्हा परिषदेशी जोडले जाईल. ग्रामस्थांची होणारी भटकंती यामुळे थांबणार असून, माहितीची देवाण-घेवाण करणे सोपे होते.

Web Title:  Gramsevak slogan for gram panchayat hi-tech

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.