तळेगाव दिंडोरीचा ग्रामसेवक निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2019 12:47 AM2019-01-07T00:47:58+5:302019-01-07T00:48:31+5:30
नाशिक : कामात हलगर्जीपणा केल्याच्या कारणास्तव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी ग्रामसेवकास निलंबित केले आहे. ...
नाशिक : कामात हलगर्जीपणा केल्याच्या कारणास्तव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी ग्रामसेवकास निलंबित केले आहे. दोन महिने प्रशासनाची दिशाभूल करण्याचा आरोप या ग्रामसेवकावर आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी नोव्हेबरमध्ये दिंडोरी तालुक्यातील तळेगाव दिंडोरी ग्रामपंचायतीस भेट दिली होती. यावेळी त्यांनी तपासणीसाठी ग्रामपंचायत दप्तराची मागणी केली असता तब्बेत ठीक नसल्याचे कारण देत दोन दिवसात दप्तर तपासणीसाठी उपलब्ध करून देतो अशी विनंती ग्रामसेवाने केली होती. मात्र मुदत देऊनही तपासणीसाठी दप्तर उपलब्ध करून देण्यास टाळाटाळ करणाऱ्या तळेगाव दिंडोरी येथील ग्रामसेवक संदीपान नेटके यांना कर्तव्यात कसूर करणे, वरिष्ठ अधिाºयांच्या सूचनांचे पालन न करणे या कारणांमुळे सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.