ग्रामसेवक जिल्हा परिषदेचा कणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2018 01:20 AM2018-12-28T01:20:08+5:302018-12-28T01:22:41+5:30

नाशिक : कोणत्याही संस्थेच्या विकासात शेवटच्या घटकापर्यंत काम करणाऱ्यांचे योगदान महत्त्वाचे असते. अशा अधिकारी, कर्मचाºयांमुळेच सर्वसामान्यांपर्यंत विकासाची कामे पोहचली जात असल्याने शासन आणि प्रशासन यांच्यातील दुवा असलेले ग्रामसेवक म्हणूनच जिल्हा परिषदेच्या विकासाचा कणा आहेत, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांनी केले. जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाच्या माध्यमातून आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी सांगळे बोलत होत्या. व्यासपीठावर सभापती मनीषा पवार, यतिंद्र पगार, डॉ. आत्माराम कुंभार्डे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते, प्रकल्प संचालक अरविंद मोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील, ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष कैलास वाघचौरे, सचिव रवींद्र शेलार आदी उपस्थित होते.

Gramsevak Zilla Parishad's spine | ग्रामसेवक जिल्हा परिषदेचा कणा

जिल्हा परिषदेच्या आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे, सभापती मनीषा पवार, यतिंद्र पगार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते, प्रकल्प संचालक अरविंद मोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील, ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष कैलास वाघचौरे, सचिव रवींद्र शेलार आदींसह पुरस्कारप्राप्त ग्रामसेवक.

googlenewsNext
ठळक मुद्देशीतल सांगळे : ग्रामसेवक पुरस्कार वितरण सोहळा

नाशिक : कोणत्याही संस्थेच्या विकासात शेवटच्या घटकापर्यंत काम करणाऱ्यांचे योगदान महत्त्वाचे असते. अशा अधिकारी, कर्मचाºयांमुळेच सर्वसामान्यांपर्यंत विकासाची कामे पोहचली जात असल्याने शासन आणि प्रशासन यांच्यातील दुवा असलेले ग्रामसेवक म्हणूनच जिल्हा परिषदेच्या विकासाचा कणा आहेत, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांनी केले.
जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाच्या माध्यमातून आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी सांगळे बोलत होत्या. व्यासपीठावर सभापती मनीषा पवार, यतिंद्र पगार, डॉ. आत्माराम कुंभार्डे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते, प्रकल्प संचालक अरविंद मोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील, ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष कैलास वाघचौरे, सचिव रवींद्र शेलार आदी उपस्थित होते.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. स्वागत गीतानंतर मान्यवरांचे स्वागत आणि सत्कार करण्यात आला. यावेळी सांगळे म्हणाल्या, नाशिक जिल्हा परिषदेच्या विकासात कर्मचाºयांचा आणि ग्रामसेवकांचा मोठा वाटा आहे. अधिकारी, कर्मचारी, विस्तार अधिकारी, ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी यांच्या प्रयत्नांमुळेच जिल्हा परिषदेला दिल्लीत पुरस्कार मिळाला आहे. जिल्हा परिषदेपेक्षा ग्रामसेवकांना मोठे अधिकार असल्याने त्यांनी ठरविले तर प्रत्येक गाव हे आदर्श होऊ शकते, असे सांगळे यांनी सांगितले. प्रत्येक जिल्हा परिषद सदस्याला आपल्या कार्यकाळात चांगले काम व्हावे, असे वाटत असते. ग्रामसेवकांच्या सहकार्यामुळे विद्यमान सदस्यांच्या काळात अनेक चांगली कामे होतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. मुख्य कार्यकारी अधिकारी गिते म्हणाले, ग्रामसेवक हा त्या गावाचा मुख्य कार्यकारी अधिकारीच असतो. ग्रामसेवकांनी आपल्या क्षमता ओळखून कामकाज केले तर सकारात्मक चित्र उभे राहू शकते. अनेक ग्रामसेवकांनी हे सिद्धदेखील केले आहे. काही अपवाद नक्कीच आहेत त्यांनी आपल्या कामकाजात सुधारणा करणे अपेक्षित आहे. जिल्हा परिषदेने पाणीपुरवठा, कुपोषण, स्वच्छता याबाबतीत चांगले काम केले आहे. ग्रामसेवकांच्या सकारात्मक मानसिकतेशिवाय हे शक्य नव्हते, असे गिते म्हणाले. डीपीडीसी, एमआरजीएसच्या माध्यमातून कामांचे नियोजन आणि पूर्णत्वास नेण्याचे कौशल्य ग्रामसेवकांनी दाखवावे, असे आवाहन गिते यांनी यावेळी केले. याप्रसंगी सभापती यतिंद्र पगार, मनीषा पवार, आत्माराम कुंभार्डे यांची भाषणे झाली.

पुरस्कार विजेते : (सन २०१५-१६)

१) वसंत पंडित जाधव (विस्तार अधिकारी, बागलाण), २) रवींद्र परशराम देवरे (यशवंतनगर), ३) संगीता दादाजी बच्छाव (नन्हावे), ४) नंदू निंबा सोनवणे (विठेवाडी), ५) निर्मला रामू खांडवी (दिंडोरी), ६) जगदीशकुमार जिजाबराव कदम (नांदूरवैद्य), ७) श्रीमती जिजाबाई सोनीराम चौधरी (आठंबे), ८) बापू दत्तू कदम (मांजरे), ९) विरूनाथ सुरेश गेंद (गंगाधरी), १०) पांडुरंग झुलाल ठोके (सय्यद पिंप्री), ११) कैलास बाबुराव बेंडके (खडक माळेगाव), १२) सचिन यमाजी नेहते (हनुमंतपाड), १३) वसंत अर्जुन भोये (गौदुणे), १४) दीपक सुभाष भोसले. १५) जितेंद्र भाईदास नांद्रे (अंबोली), १६) देवचंद बाबाजी श्ािंदे (एरंडगाव).

पुरस्कार विजेते : (सन २०१६-१७)

१) संजय धर्मा महाले (विस्तार अधिकारी ) कळवण, २) पंकज भगवान पवार (बागलाण, जोरण), ३) रोशन बळवंत सूर्यवंशी (हट्टी, चांदवड), ४) जयश्री बाळासाहेब अहेर (काचणे), ५) विनोद सुधाकर अहिरे (अवनखेड, दिंडोरी), ६) प्रीती यशवंत बुरकुल (उंबरकोण, इगतपुरी), ७) वैभव राजाराम गांगुर्डे (पाळे खुर्द, कळवण), ८) देवेंद्र कृष्णाजी हिरे (जेऊर, मालेगाव), ९) अतुल बाळासाहेब सोनवणे (क्रांतीनगर, नांदगाव), १०) माधवी सुभाष मोरे (दहेगाव, नाशिक), ११) सुनील मधुकर शिंदे (शिवरे, निफाड), १२) दुर्गादास देवराम बोसारे (आडगाव भु, पेठ), १३) विकास नीलकंठ अहिरराव (माळेगाव, सुरगाणा), १४) माधुरी हरी सानप (धोंडबार, सिन्नर), १५) श्यामकांत पंडितराव बोरसे (शिरसगाव, त्र्यंबकेश्वर), १६) योगीता दादासाहेब मतसागर (कुसुमाडी, येवला)

Web Title: Gramsevak Zilla Parishad's spine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.