शेतकऱ्यांच्या हितासाठी महाजपानुष्ठान सोहळा

By admin | Published: November 22, 2015 09:59 PM2015-11-22T21:59:20+5:302015-11-22T22:00:24+5:30

चांदवड : स्वामी शांतिगिरी महाराजांच्या उपस्थितीत बैठक

Grand Prize ceremony for farmers' welfare | शेतकऱ्यांच्या हितासाठी महाजपानुष्ठान सोहळा

शेतकऱ्यांच्या हितासाठी महाजपानुष्ठान सोहळा

Next

चांदवड : येथील रेणुकादेवी मंदिराच्या सभागृहात महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज यांच्या उपस्थितीत जय बाबाजी भक्त परिवारांची चांदवड तालुक्याची बैठक संपन्न झाली.
यावेळी विष्णू महाराज यांनी दिलेल्या प्रवचनात भक्तांचे वर्तन कसे असावे, स्वच्छ कपडे, परधन, परअन्न, परनिंदा , परस्त्री माते समान ही तत्त्वे भक्तांनी पाळावीत तर पहाटे लवकर उठून पूजा विधी हस्तलिखित जप आदि नित्यनेमाने करण्याचे आवाहन केले.
वेरूळ येथे होणाऱ्या सातदिवसीय जपाअनुष्ठान व प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या हितासाठी १००८ कुंडात्मक लक्ष्मी, कुबेर, विश्वकर्मा महा जपानुष्ठान सोहळा होणार आहे. यात महिलांसाठी १००८ कुंडाचा महायज्ञ संपन्न होणार आहे. प्रत्येक गावा-गावातून महिलांना अनुष्ठानचे आमंत्रणदेखील देण्यात आले असल्याची माहिती दिली. तसेच तालुक्यातील भक्तांनी महाप्रसादाची सेवा स्वीकारली आहे. याबाबत माहिती देण्यात आली व मार्गदर्शन करण्यात आले. बैठकीस तालुक्यातील जय बाबाजी भक्त परिवाराचे महिला-पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. भक्त परिवाराने स्वामी शांतिगिरी महाराजांचा आशीर्वाद घेतला. (वार्ताहर )

Web Title: Grand Prize ceremony for farmers' welfare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.