नातवंडांकडून आजोबाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2020 12:17 AM2020-02-03T00:17:12+5:302020-02-03T00:28:53+5:30

सातपूर पोलीस ठाणे हद्दीत फाशीच्या डोंगरालगत खड्ड्यात आमदार हिरामण खोसकर यांचे चुलते रामदास गोपाळा खोसकर यांचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी तिघा संशयित नातवंडांना पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयाने त्यांना येत्या शनिवारपर्यंत (दि.८) पोलीस कोठडी सुनावली.

Grandfather murdered by grandchildren | नातवंडांकडून आजोबाचा खून

नातवंडांकडून आजोबाचा खून

googlenewsNext
ठळक मुद्देतिघे ताब्यात : खोसकर यांच्या हत्येचा उलगडा




नाशिक : सातपूर पोलीस ठाणे हद्दीत फाशीच्या डोंगरालगत खड्ड्यात आमदार हिरामण खोसकर यांचे चुलते रामदास गोपाळा खोसकर यांचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी तिघा संशयित नातवंडांना पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयाने त्यांना येत्या शनिवारपर्यंत (दि.८) पोलीस कोठडी सुनावली.
सातपूर पोलिसांच्या हद्दीत शुक्रवारी (दि.३१) रात्री रामदास गोपाळा खोसकर यांचा मृतदेह आढळून आला. पोलीस उपनिरीक्षक शांतिलाल चव्हाण यांनी फिर्याद दिली. मयताच्या डोक्यावर तीक्ष्ण हत्याराचे घाव आढळून आल्याने खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
इगतपुरी मतदारसंघाचे आमदार हिरामण खोसकर यांचे गिरणारे गावापासून पुढे काही अंतरावर नाईकवाडी गाव आहे. त्यांच्या भाऊबंदापैकी एका चुलत्याचा खून झाल्याचे उघडकीस आले. तसेच दुसरा भाऊ काशीनाथ खोसकर हेदेखील मागील पाच दिवसांपासून बेपत्ता आहेत. खोसकर बंधूंपैकी एकाचा खून तर दुसरे अजूनही बेपत्ता असून, तालुका पोलीस ठाण्यात त्याची नोंद झाली आहे. या घटनांमुळे नाईकवाडी पंचक्रोशीत खळबळ उडाली आहे. ज्यांचा खून झाला ते रामदास हे बेपत्ता असलेले काशीनाथ यांचे मोठे बंधू होत.




मयत खोसकर यांच्या पश्चात मुलगा, तीन मुली, भाऊ असा परिवार आहे.
या गुन्ह्यात मयत रामदास यांचे नातू अंकुश सुभाष खोसकर, लक्ष्मण प्रभाकर खोसकर, सुखदेव खोसकर या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गुन्ह्यात कोणत्या शस्त्रांचा वापर केला? याचा तपास पोलीस कोठडीत चौकशीदरम्यान केला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. गुन्हा कोठे घडला याचाही उलगडा अद्याप झालेला नाही.

Web Title: Grandfather murdered by grandchildren

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.