आजोबाच्या खूनप्रकरणी नातवाला जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2019 06:42 PM2019-11-29T18:42:18+5:302019-11-29T18:42:35+5:30
कुंदेवाडीची घटना : निफाड न्यायालयाचा निकाल
लासलगाव : खर्चासाठी पैसे न दिल्याचा राग मनात धरु न सख्ख्या आजोबाचा खून केल्याप्रकरणी अंकुश सोमनाथ बर्डे (रा. कुंदेवाडी, ता. निफाड) या नातवास निफाडचे जिल्हा सत्र न्यायाधीश पी. डी. दिग्रसकर यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, ५ एप्रिल २०१८ रोजी बबन महादु जाधव (वय ६०) रा. खडक ओझर, ता. चांदवड हे आपल्या झोपडीत बसलेले असतांना तेथे रहायला आलेला मुलीचा मुलगा अंकुश सोमनाथ बर्डे (वय २२) हा खर्चासाठी पैशाची मागणी करत होता. त्यास बबन जाधव यांनी नकार दिला व तू येथुन निघुन जा, आमचे घरात राहू नको असे सांगितल्याचा त्याला राग आला. त्यामुळे अंकुश याने बांबुच्या सहाय्याने बबन जाधव यांच्या डोक्यावर व तोंडावर मारत जखमी केले. मात्र वैद्यकिय उपचार सुरु असतांना बबन जाधव यांचा मृत्यू झाल्याने अंकुश बर्डे याचेविरु ध्द वडनेभैरव पोलिस स्टेशनला खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. सदर गुन्ह्यात तपास अधिकारी पोलिस उपनिरिक्षक अरु ण पाटील यांनी निफाडच्या जिल्हा सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. सदर खटल्यात सरकार पक्षातर्फेसहाय्यक जिल्हा सरकारी वकील अॅड. रमेश कापसे यांनी एकुण ११ साक्षीदारांची साक्ष नोंदविली. न्यायालयासमोर आलेल्या साक्षी पुराव्यावरु न गुन्हा शाबित झाल्याने आरोपी अंकुश सोमनाथ बर्डे यास सश्रम कारावासाची जन्मठेप, पाच हजार रु पये दंड व दंड न भरल्यास तीन महिने सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली आहे.