हरिहर गड सर करणाऱ्या आजींची कोरोनावरही मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 01:23 AM2021-05-03T01:23:25+5:302021-05-03T01:23:47+5:30

गिर्यारोहकांना आव्हानात्मक असते, तेथे वयाच्या सत्तरीतही उमेद आणि जिद्दीने हा गड सहज सर करणाऱ्या आशाबाई आंबाडे गेल्यावर्षी सोशल मीडियावर देशभरात व्हायरल झाल्या हाेत्या. त्याच आजींना यंदा कोरोनाने गाठले खरे; परंतु दुर्दम्य इच्छाशक्ती, सकारात्मक विचार आणि योगासने, प्राणायम यावर विश्वास यामुळे त्यांनी कोरोनावर मात केली. केवळ त्यांनीच नव्हे तर त्यांची दोन मुले, सुना, नातवंडे अशा एकूण नऊ जणांनाही कोरोनाने घेरले. मात्र, त्यांनीची योग्य उपचार आणि सकारात्मक विचारांमुळे सर्व कुटुंबाने त्यावर मात केली.

Grandmother of Harihar Gad Sir also defeated Korona | हरिहर गड सर करणाऱ्या आजींची कोरोनावरही मात

हरिहर गड सर करणाऱ्या आजींची कोरोनावरही मात

googlenewsNext
ठळक मुद्देसकारात्मक विचार अन् योगासने प्राणायामाचा अनुकूल परिणाम

नाशिक : गिर्यारोहकांना आव्हानात्मक असते, तेथे वयाच्या सत्तरीतही उमेद आणि जिद्दीने हा गड सहज सर करणाऱ्या आशाबाई आंबाडे गेल्यावर्षी सोशल मीडियावर देशभरात व्हायरल झाल्या हाेत्या. त्याच आजींना यंदा कोरोनाने गाठले खरे; परंतु दुर्दम्य इच्छाशक्ती, सकारात्मक विचार आणि योगासने, प्राणायम यावर विश्वास यामुळे त्यांनी कोरोनावर मात केली. केवळ त्यांनीच नव्हे तर त्यांची दोन मुले, सुना, नातवंडे अशा एकूण नऊ जणांनाही कोरोनाने घेरले. मात्र, त्यांनीची योग्य उपचार आणि सकारात्मक विचारांमुळे सर्व कुटुंबाने त्यावर मात केली.
कोरोना संसर्ग झाल्यानंतर अनेकांना भीती वाटते आणि त्यामुळे त्यांच्या प्रकृतीवर अधिकच परिणाम होतो. विशेषत: ज्येष्ठ नागरिकांना कोरोना संसर्ग झाला तरी धक्का बसतो; परंतु  आशा आंबाडे यांनी मात्र आपल्यावरील या  संकटाला न घाबरता तोंड दिले. गेल्या २० मार्च रोजी खरे तर त्यांनी कोराेना प्रतिबंधकात्मक लस घेतली आणि त्यानंतर त्यांना ताप आला.
सुरुवातीला लसीचा डाेस घेतल्याने साईडइफेक्ट असतील म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्यानेच त्यांनी उपचारासाठी गोळ्या घेतल्या. मात्र, ताप उतरत नाही हे बघितल्यानंतर मात्र कुटुंबीयांना शंका आली. त्यामुळे त्यांनी कोराेना चाचणी केली. त्यात त्या पॉझिटिव्ह निघाल्या; पण डगमगल्या नाहीत. त्यानुसार कुटुंबीयांनी लक्ष ठेवले जेव्हा ऑक्सिजन लेव्हल ८८ झाली. तेव्हा मात्र कुटुंबीयांनी खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे दोन दिवस ऑक्सिजनवर ठेवावे लागले; परंतु नंतर ऑक्सिजनची लेव्हल वाढली आणि त्यांना लगेचच पाचव्या दिवशी डिस्चार्च मिळाला; परंतु यादरम्यान त्यांचे धाकटे चिरंजीव संजय हे पॉझिटिव्ह झाले.
त्यांच्यापाठोपाठ थोरले बंधू ॲड. मनोज आंबाडे हे पॉझिटिव्ह आले. त्यानंतर संजय यांंच्या पत्नी सुजाता आणि मृण्मयी व मृगांश ही दोन मुले तसेच मनोज यांच्या पत्नी तनुजा तसेच  वेदिका आणि वेदांत ही दोन अपत्ये  असे सर्वच जण पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले; परंतु सर्वांनीच भीतीने घाबरून न जाता कोरोनावर निश्चित मात करू, अशीच जिद्द बाळगली आणि सर्वच कुटुंब कोरोनामुक्त झाले

७० वर्षीय आजी देशभरात आल्या होत्या चर्चेत
गेल्या वर्षी कोरोनाचे संकट कमी झाल्यानंतर नोव्हेंबर महिन्यात सर्व आंबाडे कुटुंबीय सहलीसाठी हरिहर गड येथे गेले. त्यावेळी आशाबाई या  गड चढतील, असे कोणाला वाटलेे नव्हते. मात्र, त्यांनीही गड चढण्याची तयारी दर्शवली आणि कुटुंबीयांनी साथ दिली. त्यासंदर्भातील व्हिडिओ देशभरात अनेक माध्यमांत व्हायरल झाला. आंबाडे कुटुंबीय अलीबाग येथील असून नाशिकमध्ये सुमारे पन्नास वर्षांपासून स्थायिक आहेत.  दुगाव येथे  त्यांची शेती असून  आशाबाई १९९५-९६ पासून शेतीत काम करतात. आता वयामुळे त्या तेथे जात नसल्या तरी घरातही सतत काही ना काही कामात व्यस्त असतात. योगगुरू रामदेव बाबा यांच्या प्रेरणेने त्या पंधरा ते वीस आसने आणि प्राणायम नियमित करतात. मुलांना आणि विशेष करून नातंवडांना आसने शिकवून त्या करवून घेतात. एकत्रित कुटुंब आणि तेथील सकारात्मक वातावरण ही मोठी ऊर्जा असल्याचे आशाबाई सांगतात..

Web Title: Grandmother of Harihar Gad Sir also defeated Korona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.