आजी, आईचे ‘ती’च्या सोबत असावे मैत्रीचे नाते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:16 AM2021-09-23T04:16:25+5:302021-09-23T04:16:25+5:30
सिन्नर : मासिक पाळी हे एक नैसर्गिक ऋतुचक्र आहे. स्त्रीला मिळालेली निर्मितीची अनमोल देणगी आहे. या काळात पोट ...
सिन्नर : मासिक पाळी हे एक नैसर्गिक ऋतुचक्र आहे. स्त्रीला मिळालेली निर्मितीची अनमोल देणगी आहे. या काळात पोट दुखणे, चिडचिड होणे, उदाशी वाटणे, राग येणे या समस्यांना सामोरे जाताना नेहमीच मुली व महिलांनी फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे असते. आजी, आई, बहीण, आत्या व वहिनी यांचे सर्वांचेच ‘ती’च्या बरोबर मैत्रीचे नाते असणे आवश्यक आहे, असा सल्ला डॉ. वैष्णवी नेहे यांनी दिला.
किशोरवयीन मुली, त्यांच्या समस्या व त्यावरील उपाय, स्त्रियांचे मासिक पाळीबद्दल समज व गैरसमज यावर महिलांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. कामगार शक्ती फाउंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ गोंदेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
शहरातील कमलनगर, संजीवनीनगर, देशमुखनगर, साईबाबानगर या उपनगरांतील माता भगिनींना एकत्र करून घरोघरी जाऊन चार दिवस एक एक तास मार्गदर्शन केले. मार्गदर्शन शिबिर यशस्वीतेसाठी प्रमिला सरवार, स्मिता कदम, जया भोसले, कामगार शक्ती फाउंडेशन व गोंदेश्वर रोटरी क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.