नूतन शाळेतील आजी-आजोबांची मेळावा यशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 07:19 PM2019-11-20T19:19:53+5:302019-11-20T19:21:29+5:30

लासलगाव : येथील नूतन विद्या प्रसारक मंडळ संचिलत इंग्लिश मीडियम स्कूलच्या पूर्वप्राथमिक विभागाच्यावतीने आजी-आजोबा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

Grandparents Meet Success in New School | नूतन शाळेतील आजी-आजोबांची मेळावा यशस्वी

नूतन शाळेतील आजी-आजोबांची मेळावा यशस्वी

Next
ठळक मुद्देविद्यार्थिनींनी आजी-आजोबांचाचे महत्व आपल्या शब्दात व्यक्त केले.

लासलगाव : येथील नूतन विद्या प्रसारक मंडळ संचिलत इंग्लिश मीडियम स्कूलच्या पूर्वप्राथमिक विभागाच्यावतीने आजी-आजोबा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात महिला मोठ्या प्रमाणात नोकरी-व्यवसायासाठी बाहेर पडत असताना छोट्या मुलांच्या संगोपनाची जबाबदारी ही प्रमुख्याने आजी-आजोबांवर येते. आजी-आजोबा हेच खरे संस्काराचे व संस्कृतीचे विद्यापीठ आह,े या भावनेतून त्यांना निमंत्रित करण्यात आले होते.
बदलत्या कुटुंब व्यवस्थेत ज्येष्ठ नागरिक हा तसा काहीसा दुर्लक्षीत घटक मात्र नातवांचा सांभाळ करण्याबरोबरच त्यांची मानसिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि बौद्धिक जडणघडण करण्यामध्ये आजी-आजोबांचा वाटा मोलाचा आहे.
बदलत्या समाज जीवनात ज्येष्ठांच्या मार्गदर्शन व अनुभवाने समाज पुढे जाईल असे विचार याप्रसंगी आजी-आजोबांच्या वतीने सुलेमान मुलाणी, अंबादास होळकर, राजु राणा यांनी व्यक्त केले तसेच आरोही धुमाळ व कस्तुरी पगार या विद्यार्थिनींनी आजी-आजोबांचाचे महत्व आपल्या शब्दात व्यक्त केले.
याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य चंद्रशेखर होळकर शिक्षक पालक संघाचे सदस्य व प्राचार्य सत्तार शेख आदी उपस्थित होते. तर विद्यार्थिनीनी विविध गीते सादर केली याप्रसंगी ज्येष्ठांसाठी विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्र माचे सूत्रसंचालन अर्चना कापसे, स्वागत तेजस्वी पटेल तर आभार मनीषा जेउघाले यांनी मानले. कार्यक्र मासाठी सीमा पवार व रोहिणी खापरे यांनी परिश्रम घेतले. या वेळी संस्थेचे जनरल सेक्रेटरी गोविंद होळकर स्कूल समिती अध्यक्ष संदीप होळकर, सदस्य हसमुख पटेल, योगेश पाटील व सचिन मालपाणी यांनी उपक्र मास शुभेच्छा दिल्या.
 

Web Title: Grandparents Meet Success in New School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.