अंध-अपंगांच्या ‘डे-केअर’ केंद्रांना अनुदान मिळावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 12:34 AM2018-04-03T00:34:01+5:302018-04-03T00:34:01+5:30
नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लार्इंड युनिट महाराष्ट्र या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी राज्यपाल विद्यासागर राव यांची भेट घेऊन अंध, अपंगांच्या डे-केअर सेंटरला अनुदान मिळावे तसेच अन्य मागण्या करण्यात आल्या. यावेळी मागण्याची दखल घेऊन राज्यपालांनी त्यासंबंधी निर्देश दिले.
नाशिक : नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लार्इंड युनिट महाराष्ट्र या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी राज्यपाल विद्यासागर राव यांची भेट घेऊन अंध, अपंगांच्या डे-केअर सेंटरला अनुदान मिळावे तसेच अन्य मागण्या करण्यात आल्या. यावेळी मागण्याची दखल घेऊन राज्यपालांनी त्यासंबंधी निर्देश दिले. नॅब संस्थेच्या पदाधिकाºयांनी दृष्टिबाधित आणि बहुविकलांग आणि अन्य दिव्यांग संवर्गाच्या एकूण २५ प्रश्नासंदर्भात महाराष्ट्राचे राज्यपाल विद्यासागर राव यांच्यासमवेत राजभवन सभागृहात भेट घेऊन चर्चा केली. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे सचिव दिनेश वाघमारे, राज्यपालांचे सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, सचिव रमेश डिसोझा, अपंग कल्याण आयुक्तालयाचे आयुक्त नितीन पाटील उपस्थित होते. याप्रसंगी नॅब महाराष्ट्राचे अध्यक्ष रामेश्वर कलंत्री, मानद महासचिव गोपी मयूर, सहसचिव मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, सूर्यभान साळुंखे यांनी नॅब महाराष्ट्राचे प्रलंबित प्रश्न मांडले. यावेळी झालेल्या बैठकीत सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, सामाजिक न्याय सचिव दिनेश वाघमारे, बी. वेणुगोपाल रेड्डी, संजयकुमार, सीताराम कुंटे, रणजित सिंह देओल, सुवर्णा खरात आदी उपस्थित होते.
विशेषत: नॅब महाराष्ट्रच्या कर्णबधिर, अंधत्व, बहुविकलांग डे-केअर सेंटर २०००पासून अनुदानित व्हावे, तसेच २५ अंध मुलींना वसतिगृहात अनुदान मिळावे. शाळेतील विशेष शिक्षकांचे एक रिक्तपद तातडीने भरावे आदी मागण्या करण्यात आल्या. यावेळी सामाजिक न्याय विशेष सहाय्य सचिव दिनेश वाघमारे यांनी संस्थेचे प्रश्न व दिव्यांगांचे सामान्य प्रश्न राज्यपालांना सादर करून शासनस्तरावरील कार्यवाहीची माहिती दिली. तसेच उर्वरित प्रश्नांसंदर्भात लवकरच निर्णय घेण्याचे मान्य केले.