नाविन्यपूर्ण योजनेतून शेतकऱ्यासांठी अनुदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 05:46 PM2018-11-18T17:46:58+5:302018-11-18T17:47:23+5:30
सिन्नर : पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र व जिल्हा परिषद नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सिन्नर पंचायत समितीच्या वतीने शेतकºयांना नाविण्यपूर्ण जनावरे खरेदी करण्यासाठी नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत जनावरे खरेदी, पोट्री शेड बांधकाम यासाठी ५० ते ७५ टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे.

सर्वसाधारण घटकांसाठी हे अनुदान ५० टक्के व विशेष घटक प्रवर्गातील शेतकºयांसाठी ७५ टक्के अनुदान मिळणार असल्याची माहिती पंचायत समिती सभापती भगवान पथवे, उपसभापती जगन्नाथ भाबड, पशुसंवर्धन विकास अधिकारी डॉ. मिलींद भणगे यांनी दिली. यासाठी शेतकºयांनी २९ नोव्हेंबर पर्यंत या संकेत स्थळावर आॅन लाईन अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांनी केले आहे.