करवसुली केल्यासच अनुदान

By Admin | Published: June 20, 2017 01:07 AM2017-06-20T01:07:27+5:302017-06-20T01:07:41+5:30

करवसुली केल्यासच अनुदान

Grant only after taxation | करवसुली केल्यासच अनुदान

करवसुली केल्यासच अनुदान

googlenewsNext

 सिन्नर : विभागीय उपसंचालकांची पालिकेला तंबीलोकमत न्यूज नेटवर्क
सिन्नर : २०१६-१७ या आर्थिक वर्षात सिन्नर नगरपालिकेची करवसुली अवघी ५५ टक्के झाल्याबद्दल नाराजी व्यक्त करत ३० जून २०१७ पर्यंत शंभर टक्के कर वसुली करा अन्यथा शहर विकासासाठी पालिकेला प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारचे अनुदान न देण्याचा इशारा नाशिक विभागीय उपसंचालक कुलकर्णी यांनी पालिका अधिकाऱ्यांना दिला.
कुलकर्णी यांच्यासह जिल्हा प्रशासन अधिकारी एम. बी. खोडके यांनी घरपट्टी व पाणीपट्टी कमी प्रमाणात वसूल झाल्याबाबत सिन्नर नगरपालिका कार्यालयास भेट देऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांना धारेवर धरले. गेल्या काही वर्षांत सिन्नर नगरपालिकेचे करवसुलीचे प्रमाण अत्यल्प राहिले आहे.

Web Title: Grant only after taxation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.