वाहन खरेदी नसल्याने अनुदान प्रलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2018 12:51 AM2018-06-07T00:51:38+5:302018-06-07T00:51:38+5:30
नाशिक : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या वतीने स्वयंरोजगारासाठी मागास वर्गातील नागरिकांना चारचाकी वाहन खरेदी करण्यासाठी अनुदान देण्यात येते. मात्र अनेक तालुक्यांमधील लाभार्थ्यांना अद्याप अनुदान वितरित करण्यात आले नसल्याची बाब जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत जिल्हा परिषद सदस्यांनी उपस्थित केली होती. याबाबत आज आढावा घेण्यात आला असता जिल्ह्यातील १३३ लाभार्थ्यांपैकी १०९ लाभार्थ्यांनी चारचाकी वाहन खरेदी केले असून, त्यांना १०० टक्के अनुदान देण्यात आले आहे. तर २४ लाभार्थ्यांनी वाहन खरेदी केलेले नसल्यामुळे त्यांना अनुदान देण्यात आलेले नाही.

मंगळवारी झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सदस्य महेंद्रकुमार काळे व अन्य जिल्हा परिषद सदस्यांनी याबाबत प्रश्न उपस्थित करून विचारणा केली होती. याची दखल घेत डॉ. नरेश गिते यांनी किती लाभार्थ्यांना अनुदान वाटप केले, किती लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदान जमा झाले याबाबत खात्री करून उर्वरित सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदान जमा करून अहवाल सदर करण्याचे निर्देश दिले. याबाबत आज सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप चौधरी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्स घेऊन गटविकास अधिकारी व सहायक गटविकास अधिकाºयांचा आढावा घेतला. त्यातून जिल्ह्णातील १३३ लाभार्थ्यांपैकी १०९ लाभार्थ्यांनी चारचाकी वाहन खरेदी केले असून त्यांना १०० टक्के अनुदान देण्यात आले आहे. तर २४ लाभार्थ्यांनी वाहन खरेदी केलेले नसल्यामुळे त्यांना अनुदान देण्यात आलेले नसल्याचे आढळून आले.