शिक्षकांना अनुदान द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2020 10:59 PM2020-02-02T22:59:46+5:302020-02-03T00:23:17+5:30
राज्य खासगी शिक्षक संघटनेचे राज्य संघटक विशाल बोरसे, जिल्हा अध्यक्ष रवींद्र आहिरे यांच्या नेतृत्वाखाली नायब तहसीलदार राजेंद्र सूर्यवंशी यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
मालेगाव : राज्य खासगी शिक्षक संघटनेचे राज्य संघटक विशाल बोरसे, जिल्हा अध्यक्ष रवींद्र आहिरे यांच्या नेतृत्वाखाली नायब तहसीलदार राजेंद्र सूर्यवंशी यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
राज्यातील खासगी अनुदानास पात्र घोषित शाळा व तुकड्यांना पूर्वीच्या सरकारने नियमबाह्य सरसकट २० टक्के अनुदान दिले. त्यानंतर विविध आंदोलने होऊन महाविकास आघाडी सरकारने सदर शाळांना प्रचलित अनुदान देण्याचा शालेय शिक्षण विभागाचा २९ जानेवारी २०२० शासन निर्णय काढला. परंतु सदर शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी आर्थिक तरतुदीची आवश्यकता आहे. तसेच सदर शासन निर्णयात राज्यातील खासगी विनाअनुदानित शाळा व तुकड्या समाविष्ट नाहीत. त्यामुळे शालेय शिक्षणमंत्र्यांना प्रचलित अनुदान निधी मंजुरी व अघोषित खासगी शाळा व तुकड्या निधीसह घोषित करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी मराठी व उर्दू शाळेतील शिक्षकांसह दीपक आसान, ललित भामरे, विशाल भामरे, करीम मनियार, अकिल खान, सुरेखा पाटील, दानिश खाटीक, आरिफ अहमद, श्रीमती वाय. बी. आहेर, पी. एस. शेवाळे, श्रीमती के. एच. वाघ, एम. एस.
शेवाळे, आदिल समीर आदी उपस्थित होते.