वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना अनुदान उपलब्ध
By Admin | Published: March 6, 2017 01:28 AM2017-03-06T01:28:19+5:302017-03-06T01:28:32+5:30
नाशिक : वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरू करण्यात आली आहे.
नाशिक : वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरू करण्यात आली आहे. समाज कल्याण खात्याने यासंदर्भातील निर्णय घेतला असून, ज्या विद्यार्थ्यांना कोणत्याही वसतिगृहात प्रवेश मिळू शकलेला नाही, असे विद्यार्थी यासाठी पात्र ठरतील.
या योजनेसाठी इयत्ता अकरावी, बारावी आणि त्यानंतरच्या व्यावसायिक, बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळालेल्या, परंतु कोणत्याही शासकीय किंवा महाविद्यालयाच्या वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांना भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधांसाठी थेट अनुदान उपलब्ध करून देणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेची सुरुवात सन २०१६-१७ पासून सामाजिक न्याय विभागाने सुरू केली आहे. या योजनेसाठी अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांनी आपल्या मूळ जिल्ह्यातील (जात प्रमाणपत्र जेथून काढले आहे) सहायक समाज कल्याण आयुक्त कार्यालयात दि. १६ मार्चपर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन प्रादेशिक उपआयुक्त काशीनाथ गवळे यांनी केले आहे. या योजनेसाठी विद्यार्थ्यांना १० वी, १२ वी, पदवी, पदविका या परीक्षांमध्ये ६० टक्क्यापेक्षा अधिक गुण असणे अनिवार्य असून, या प्रवर्गातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ही मर्यादा ५० टक्के गुण आहे. विद्यार्थ्यांच्या पालकांचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा अधिक नसावे, विद्यार्थी बाहेरगावी शिकणारा असावा म्हणजे विद्यार्थी स्थानिक नसावा (विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ज्या ठिकाणी आहे, अशा ठिकाणचा सदर विद्यार्थी रहिवासी नसावा) पात्र विद्यार्थ्याची निवड गुणवत्तेनुसार करण्यात येईल. जे विद्यार्थी व्यावसायिक पाठ्यक्रमाशी संलग्न निर्वाहभत्ता या योजनेचा लाभ घेत असतील त्यांना हा लाभ मिळणार नाही.
या योजनेच्या लाभासाठी विद्यार्थ्यांनी आपले बॅँक खाते आधार कार्डाशी लिंक करून घेणे बंधनकारक आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जाचा नमुना व माहिती ँ३३स्र२://ेंँंी२ूँङ्म’.ेंँं१ं२ँ३१ं.ॅङ्म५.्रल्ल सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहात वास्तव्यास असलेल्या विद्यार्थ्यांना ही योजना लागू नाही, असेही सामाजिक न्याय विभागाने कळविले आहे. (प्रतिनिधी)