४० हजार शेतकऱ्यांच्या नावावर अनुदान वर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 01:38 AM2019-02-12T01:38:16+5:302019-02-12T01:40:17+5:30
मालेगाव तालुक्यातील ७१ गावांमधील प्रधानमंत्री कृषी सन्मान योजनेच्या ४० हजार १३८ लाभार्थी शेतकºयांच्या नावावर पहिल्या टप्प्यात १६ कोटी ९२ लाख ८३ हजार ९७६ रुपये वर्ग करण्यात आल्याची माहिती तहसिलदार ज्योती देवरे यांनी दिली.
मालेगाव : तालुक्यातील ७१ गावांमधील प्रधानमंत्री कृषी सन्मान योजनेच्या ४० हजार १३८ लाभार्थी शेतकºयांच्या नावावर पहिल्या टप्प्यात १६ कोटी ९२ लाख ८३ हजार ९७६ रुपये वर्ग करण्यात आल्याची माहिती तहसिलदार ज्योती देवरे यांनी दिली.
खरीप २०१८ मधील दुष्काळी अनुदान प्राप्त झाले आहे. दोन हेक्टरपर्यंत कोरडवाहू क्षेत्र असणाºया शेतकºयांना १३ हजार ६०० तर बहुवार्षिक फळबाग क्षेत्र असलेले शेतकºयांना ३६ हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे. या अनुदानाच्या पन्नास टक्के रक्कम पहिल्या टप्प्यात जमा करण्यात आली आहे. महसुल विभागाने शासनाकडे ८७ कोटी २८ लाख २३ हजार १८ रुपये मागणी नोंदवण्यात आली होती. त्यापैकी पहिल्या टप्प्यात तालुक्याला १६ कोटी ९४ लाख २४ हजार ५२८ रुपये प्राप्त झाले होते. गेल्या दोन-तीन दिवसांपासून महसुल विभागाने गावनिहाय पात्र शेतकºयांच्या याद्या बनविण्याचे काम युद्धपातळीवर सुरु केले होते. ७१ गावांमधील ४० हजार १३८ शेतकºयांच्या नावावर अनुदान वर्ग करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात ५० टक्के रक्कम दिली जाणार आहे. यात कोरडवाहू शेतकºयाला ६ हजार ८०० ते बहुवार्षिक फळबागधारक शेतकºयाला १८ हजार रुपये अनुदान दिले जाणार असल्याची माहिती तहसिलदार देवरे यांनी दिली.
तालुक्यातील दीडशे गावांमधील १ लाख १० हजार १६० शेतकºयांना शासनाने ८७ कोटी ८८ लाख २३ हजार १८ रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी आहे. पहिल्या टप्प्यात केवळ १६ कोटी ९४ लाख २४ हजार ५२८ रुपये प्राप्त झाले आहे.
२ हेक्टरपर्यंत क्षेत्र असलेल्या शेतकºयाला या योजनेचा लाभ मिळणार आहे.