थंडीचा जोर वाढल्याने द्राक्ष बागायतदार धास्तावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 01:31 PM2017-12-19T13:31:44+5:302017-12-19T13:32:07+5:30
सायखेडा : निफाड तालुक्यात थंडीने जोर धरल्याने पारा १० अंशावर पोहोचला आहे, त्यामुळे द्राक्ष बागायतदार शेतकरी वाढत्या थंडीने द्राक्ष मन्यांना तडे, भुरी रोग वाढण्याच्या भीतीने धास्तावले आहेत.
सायखेडा : निफाड तालुक्यात थंडीने जोर धरल्याने पारा १० अंशावर पोहोचला आहे, त्यामुळे द्राक्ष बागायतदार शेतकरी वाढत्या थंडीने द्राक्ष मन्यांना तडे, भुरी रोग वाढण्याच्या भीतीने धास्तावले आहेत. अनेक काळी द्राक्ष देण्यासाठी तयार झाली असली तरी तर सतत बदलत असलेल्या हवामानामुळे पीक शेवटच्या टप्प्यात धोक्यात आले आहे.
काही दिवसांपूर्वी ओखा वादळाचा तडाख्यातून शेतकरी कसाबसा सावरत असतांनाच दोन दिवसांपासून थंडी वाढली आहे. थंडीसोबत कधी ढगाळ तर कधी वारा असा वतावरणात सतत बदल होत आहे. त्यामुळे वाढत्या थंडीने द्राक्ष बागांवर भुरी रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. शिवाय मणी फुगवण थांबली आहे. जे प्लॉट देण्यासाठी आले आहे. त्यांना वाढत्या थंडीने तडे जात असल्याने शेतकºयांच्या तोंडाजवळ आलेला घास निसर्ग हिरावून नेतोय का अशी चिंता व्यक्त केली जात आहे. ढगाळ वातावरणामुळे कांदा, पालेभाज्या,फळभाज्या यांच्यावर मवा ,अळी, करपा या रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. पिकांची वाढ होत नाही, शेतात उभे पीक करपा रोगामुळे वाया जाण्याची शक्यता असल्याने शेतकरी धास्तावले आहेत. द्राक्ष बागायतदार शेतकºयांनी पीक वाचविण्यासाठी कसरतीमुळे लाखो रु पये खर्च वाढत असूनही बाग वाचविणे जिकरीचे झाले आहे