कंपन्यांच्या वायुप्रदूषणामुळे द्राक्षबागांचे नुकसान

By admin | Published: June 20, 2017 12:31 AM2017-06-20T00:31:50+5:302017-06-20T00:32:09+5:30

कंपन्यांच्या वायुप्रदूषणामुळे द्राक्षबागांचे नुकसान

Grape damage due to air pollution of companies | कंपन्यांच्या वायुप्रदूषणामुळे द्राक्षबागांचे नुकसान

कंपन्यांच्या वायुप्रदूषणामुळे द्राक्षबागांचे नुकसान

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वरखेडा : दिंडोरी तालुक्यातील लखमापूर येथील विविध कंपन्यांच्या वायुप्रदूषणामुळे पूर्व भागातील द्राक्षबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या संदर्भात संबधित विभागाकडे अनेकवेळा तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.
लखमापूर फाटा परिसरात वायुप्रदूषण करणाऱ्या अनेक कंपन्या असून, रात्री-अपरात्री वायु प्रदूषण होत असल्याने ,शेतीपीकांवर व त्याचप्रमाणे, द्राक्षबागांचे पाने करपने,नव्यानेच छाटणी करण्यात आलेल्या द्राक्षबागावर वायूप्रदुषनामुळे विपरीत परिणाम होत असून द्राक्षबबागा वाचिवण्यासाठी मोठ्या प्रमाणात महागडी औषधे फवारणी करावी लागत आहे. नुकसानग्रस्त व बाधित शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून, संबंधित विभागाकडे अनेक वेळा तक्र ार करूनही ,दखल घेतली जात नसल्याने तालूक्यातील परमोरी येथील, सरपंच सिंधूबाई दिघे, उपसरपंच विलास काळोगे, पोलिस पाटील सुभाष शिवले, संजय काळोगे, पुंडलिक जाधव, विनायक जाधव, आदी बाधित शेतकऱ्यांनी लेखी स्वरूपात तहसीलदारांसह जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्र ार केली असून, संबधित विभागाच्या वतीने, दखल न-घेतल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

Web Title: Grape damage due to air pollution of companies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.