अवकाळी पावसाने द्राक्ष उत्पादक संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:15 AM2021-03-21T04:15:10+5:302021-03-21T04:15:10+5:30
सातत्याने बदलते हवामान बेमोसमी पाऊस यातून मोठ्या कष्टाने महागडे औषधे फवरत द्राक्ष बागा वाचवल्या. मात्र भाव कमी मिळत असल्याने ...
सातत्याने बदलते हवामान बेमोसमी पाऊस यातून मोठ्या कष्टाने महागडे औषधे फवरत द्राक्ष बागा वाचवल्या. मात्र भाव कमी मिळत असल्याने अडचणीत सापडलेल्या द्राक्ष उत्पादकांची पुन्हा बेमोसमी पावसाने झोप उडवली आहे.
द्राक्षबागा ,गहू ,हरभरा या सर्वच पिकांना बेमोसमी पावसाचा फटका बसला आहे. तीन वाजेच्या सुमारास मातेरेवाडी, वरखेडा,बोपेगाव, खेडगाव ,कादवा कारखाना परिसरात बेमोसमी पावसाने तडाखा दिल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मागील वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. मागील वर्षी झालेला खर्च या वर्षी काही प्रमाणात भरून निघेल अशी अपेक्षा शेतकरी वर्गात होती. परंतु लॉकडाऊन च्या धास्तीने आधीच द्राक्ष मालाचे दर कमी असताना झालेल्या पावसाने शेतकरी वर्ग पुरता हतबल झाला आहे.