जळगाव नेऊर परिसरात द्राक्ष बागायतदार संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2020 11:54 PM2020-08-29T23:54:58+5:302020-08-30T01:20:21+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव नेऊर : मागील वर्षाच्या अनुभवातून द्राक्ष उत्पादक संकटात सापडले असून, गतवर्षी बऱ्याच द्राक्ष उत्पादकांनी अर्ली छाटणीचे नियोजन केले. परंतु सततच्या ढगाळ वातावरणामुळे घड जिरण्याची समस्या उद्भवली.

Grape growers in crisis in Jalgaon Neur area | जळगाव नेऊर परिसरात द्राक्ष बागायतदार संकटात

जळगाव नेऊर परिसरात द्राक्ष बागायतदार संकटात

googlenewsNext
ठळक मुद्देसावध पवित्रा । छाटण्या उशिराने होेण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव नेऊर : मागील वर्षाच्या अनुभवातून द्राक्ष उत्पादक संकटात सापडले असून, गतवर्षी बऱ्याच द्राक्ष उत्पादकांनी अर्ली छाटणीचे नियोजन केले. परंतु सततच्या ढगाळ वातावरणामुळे घड जिरण्याची समस्या उद्भवली.
जे काही वाचल्या त्या बागांवर डावणी रोगाने आक्रमक केल्यामुळे बºयाच बागा सगळा खर्च करून सोडून देण्याची वेळ द्राक्ष उत्पादकांवर आली, तर उशिराच्या बागा उत्तम आल्या. आता चार पैसे पदरात पडतील असे वाटत असतानाच कोरोना संकट उभे राहिल्याने अनेक शेतकऱ्यांच्या द्राक्षाची झाडावरच मनुके तयार झाल्यामुळे द्राक्ष उत्पादक संकटात सापडले आहेत.
मागील वर्षी द्राक्षबागा छाटणीनंतर सुरू झालेला पावसायामुळे मोठ्या प्रमाणात शेतकºयांच्या द्राक्षबागा समस्यांच्या विळख्यात सापडल्याने गळ, कुज, डावणी, भुरीचा प्रादुर्भाव झाल्याने अनेक शेतकºयांना फटका बसला. अर्ली द्राक्ष छाटणी
करावी की नाही?
मागील वर्षी सर्वात जास्त फटका बसला तो द्राक्ष उत्पादक शेतकºयांना. अर्ली द्राक्षबागा अतिवृष्टीमुळे कुज, डावनी, भुरी, लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्याने निर्यातक्षम द्राक्षबागांवर परिणाम झाला, तर उशिरा छाटलेल्या बागा कोरोनाच्या विळख्यात सापडल्याने अनेक शेतकºयांच्या द्राक्षबागेत व्यापाºयांअभावी झाडावरच मनुके तयार झाल्यामुळे यावर्षी शेतकरी अर्ली द्राक्ष छाटणी करावी की नाही अशा संभ्रमात पडला आहे.मागील वर्षी १ सप्टेंबरला छाटणी केली; पण छाटणी केल्यानंतर वातावरणात बदल होऊन मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसाने द्राक्षाची कुज होऊन घड गळाल्याने व नंतर डावणीचा प्रादुर्भाव झाल्याने मोठ्या प्रमाणावर खर्च झाला. त्यामुळे यावर्षी द्राक्ष छाटणी उशिरा घेण्याचा निर्णय घेतला.
- नवनाथ शिंदे,
द्राक्ष उत्पादक,
जळगाव नेऊर

Web Title: Grape growers in crisis in Jalgaon Neur area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.