खेडगाव परिसरात मुसळधार पावसाने द्राक्ष उत्पादक पुन्हा एकदा संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2020 10:40 PM2020-10-18T22:40:24+5:302020-10-19T00:22:11+5:30
खेडगाव : मागील काही दिवसांपासून सुरू असलेला पाऊस त्यात शनिवारी(दि.१७) रात्री व रविवारी (दि.१८) दुपारी झालेल्या मुसळधार पावसाने द्राक्ष बागायतदार पुरते घाबरले आहेत, त्यातच खराब हवामानामुळे द्राक्ष घड जिरण्याचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात असून त्यात हा पडणारा रोजचा पाऊस जे काही थोड्या प्रमाणात वाचणार ते पण डावनी ह्या रोगालापोषक आसे वातावरण आहे आधीच बागा कमी निघाल्याने आता ह्या पावसाने पावडरी मारण्याचा खर्च वाढणार आहे
खेडगाव : मागील काही दिवसांपासून सुरू असलेला पाऊस त्यात शनिवारी(दि.१७) रात्री व रविवारी (दि.१८) दुपारी झालेल्या मुसळधार पावसाने द्राक्ष बागायतदार पुरते घाबरले आहेत, त्यातच खराब हवामानामुळे द्राक्ष घड जिरण्याचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात असून त्यात हा पडणारा रोजचा पाऊस जे काही थोड्या प्रमाणात वाचणार ते पण डावनी ह्या रोगालापोषक आसे वातावरण आहे आधीच बागा कमी निघाल्याने आता ह्या पावसाने पावडरी मारण्याचा खर्च वाढणार आहे मागील वर्षी कोरोनाच्या संकटात कवडीमोल दराने द्राक्ष विकल्याने आधीच खूप कर्ज द्राक्ष उत्पादक शेतकऱयांचे वाढले आहे मागील वर्षी मालाचे पैसे न झाल्याने तसेच अनेक द्राक्ष व्यापारी वर्गाने अजूनही पैसे न दिल्याने शेतकरी पावडर दुकांनदारचे बील पूर्ण देऊ शकले नाही त्यामुळे पावडर दुकानदार रोख पैसे असल्याशिवाय नवीन पावडर द्यायला तयार नाही अश्या परस्थितीत या अवकाळी पावसाने मोठया प्रमाणात नुकसान होत आहे त्यात मका सोयाबीन टोमॅटो ह्या पिंकामुळे थोडाफार हातभार लागण्याची शक्यता असताना ह्या पावसाने नेमकी सोंगणी झालेले मका व सोयाबीन या परतीच्या पावसाने भिजली गेली आहे तसेच नवीन ग्रापटींग ला डाव नी प्रादुर्भावणे शेतकरी चिंतीत असताना गोगलगाय व उडद्या हा किड्या मुळे शेतकरी वर्गास खूप फवारणी करावी लागत आहे त्यात गोगलगाय कशानेही फरक पडत नाही ऊन पडले की जमिनीत जाते व पाऊस पडला की परत जमिनीच्या वरती येऊन द्राक्ष वेलीची नवीन फूट खाऊन टाकते अश्या अनेक संकटांना तोंड देत शेतकरी काम करतोय त्या त हा अवकाळी पाऊस कसे बाग काढायचे या चिंतेत शेतकरी दिसतोय मागील अनेक वर्षाच्या नुकसानीचे पंचनामे होऊनही सरकारी मदत अजून बरयाच शेतकरी वर्गाला मिळाली नाही तसेच जाहीर झालेली कर्ज माफी पासून अजून अनेक शेतकरी वंचित आहे त्या मुळे शेतकरी अस्मानी व सुलतानी ह्या संकटांना तोंड देत आहे.